

वाकड, ता. १६ :‘‘नवउद्योजकांच्या क्षमतांना उलगडून नावीन्यपूर्ण कल्पनांना कौशल्यपूर्ण व्यवसायांमध्ये रूपांतरित करण्यास आणि शाश्वत उपक्रमांद्वारे आर्थिक वृद्धीस हातभार लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून जागतिक दर्जाचे इनक्युबेशन व्यासपीठ स्थापन केले आहे. त्याद्वारे हजारो नवउद्योजक घडविण्याचा निश्चय केला आहे’’, असे इंदिरा विद्यापीठाच्या तसेच इंदिरा शिक्षण समूहाच्या अध्यक्षा व मुख्य मार्गदर्शिका डॉ. तरिता शंकर यांनी जाहीर केले.
ताथवडे येथील इंदिरा विद्यापीठात स्वकीयम सेंटर फॉर इनक्युबेशन ॲण्ड इनोव्हेशन फाउंडेशनचे सोमवारी (ता. १६) उदघाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कुलगुरू डॉ. अनघा जोशी, प्रा. चेतन वाकलकर, बलजीत गुजराल, शार्दूल गांगल, दीपंजय भालेराव, शान मेहंदळे, साहिल मेहंदळे, मनीष दालमिया, डॉ. अंजली काळकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
डॉ. शंकर म्हणाल्या, ‘‘स्वकीयम हे एक गतिमान स्टार्ट-अप इको सिस्टम हब आहे. नावीन्यपूर्ण कल्पनांचे रूपांतर उद्योगात करणे आणि उद्योजकीय प्रतिभा विकसित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. त्यांच्या कल्पनांना वास्तवात प्रभावी उपक्रमांमध्ये रूपांतरित करण्यासाठी पायाभूत सुविधा, मार्गदर्शन आणि संसाधने प्रदान करण्यात येणार आहेत.’’
स्वकीयमचे प्रमुख बलजीत गुजराल म्हणाले, ‘‘स्टार्ट अप्स हे नावीन्याचे इंजिन आहेत. आमचे केंद्र उद्योग जोडणी, मार्गदर्शन आणि धैर्याने त्याला चालना देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे इनक्युबेशन सेंटर भविष्यातील शाश्वत व्यवसायाच्या धाडसी कल्पनांसाठी एक प्रेरित ठरेल.’’
इन्क्युबेशन सेंटरचे संचालक आणि स्टार्टअप मेंटर डॉ. दीपंजय भालेराव व संपूर्ण स्वकीयम टीमचे पाठबळ आहे.
काय आहे स्वकीयम ?
‘स्वकीयम’ याचा अर्थ स्वतःचे किंवा आपल्यांसाठीचे असणे असा होतो. हे नाव मालकी आणि स्वचलित नवोपक्रमाला चालना देण्याचे सार दर्शवते. तेथे उद्योजकांना त्यांच्या कल्पनांची मालकी घेण्यास आणि यशस्वी प्रयत्नांमध्ये क्रांती घडवून आणण्यास प्रोत्साहित केले जाणार आहे.
PNE25V23325
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.