पावसामुळे झेंडू शेतीचे मोठे नुकसान

पावसामुळे झेंडू शेतीचे मोठे नुकसान

Published on

सोमाटणे, ता. १८ : पवन मावळाच्या पूर्व भागातील झेंडू शेतीचे पावसाने मोठे नुकसान झाले आहे. पिकासाठी केलेला खर्चही निघाला नसल्याची स्थिती आहे.
उन्हाळ्यात लग्नसराई व विविध यात्रा-उत्सवामुळे पवनमावळ पूर्व भागातील आकर्षक असणाऱ्या झेंडूच्या फुलांना शहरी बाजारपेठेत चांगली मागणी असते. फुलशेतीपासून चांगले पैसे मिळत असल्याने दरवर्षी पवन मावळातील शेतकरी झेंडूचे अधिक उत्पादन घेतात. या वर्षी शेतकऱ्यांनी झेंडूची अधिक लावणी केली. मेच्या सुरुवातीलाच तोडणी सुरू झाली होती. बाजारभाव चांगले असल्याने सुरुवातीला चांगले पैसे मिळाले, परंतु ही परिस्थिती अधिक काळ टिकली नाही. या वर्षी १५ मेपासून पावसाला सुरूवात झाली होती. १५ मे ते १५ जून या महिनाभरात कासारसाई, आढले, पुसाणे धरणक्षेत्रांत एकूण ५४० मि.मी. इतका पाऊस झाला. या पावसामुळे झेंडूच्या शेतामध्ये सतत पाणी साठून राहिले. यामुळे पीक पूर्ण वाया गेले. या पिकासाठी अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून मोठा खर्च केला होता. पण, पावसाने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.


दरवर्षी मेमध्ये झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे चांगले मिळतात. परंतु, यावर्षी अचानक पडलेल्या पावसाने पीक पूर्ण वाया गेल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांना भरपाई मिळावी.
- संजूकुमार बोडके, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड फुल मार्केट

Smt17Sf1.

PNE25V23433

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com