

पिंपरी, ता. २७ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळामार्फत उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नियोजित फेऱ्या व्यतिरिक्त लांब पल्ल्याच्या मार्गावर दररोज ७६४ फेऱ्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
शाळांना उन्हाळी सुट्टी लागल्यावर यात्रा, सहली, यासह कुटुंबासह पर्यटनाला जाणारे प्रवासी एसटीने जाण्यास पसंती देतात. प्रवाशी संख्या लक्षात घेता एसटी महामंडळातर्फे दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत नियोजित फेऱ्या व्यतिरिक्त जादा वाहतूक केली जाते. यंदाही नियोजित फेऱ्या व्यतिरिक्त लांब पल्ल्याच्या मार्गावर दररोज ७६४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या बस संगणकीय आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
येथे करा बसचे आरक्षण
प्रवाशांसाठी महामंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.msrtc.maharashtra.gov.in वर व npublic.msrtcors.com या संकेतस्थळावर तसेच मोबाइल ॲपव्दारे आणि महामंडळाच्या बसस्थानकांवरील आरक्षण केंद्रावर आगाऊ आरक्षण करण्याची सुविध उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
योजनांचा लाभ घेता येणार
महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना आणि ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजने’अंतर्गत ज्येष्ठांना सवलत देण्यात आली आहे. तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.