रक्षाबंधनातून सामाजिक बांधिलकीचा धागा

रक्षाबंधनातून सामाजिक बांधिलकीचा धागा

Published on

पिंपरी, ता. ९ ः बहीण भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. रक्षाबंधन हा सन केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून, समाजातील इतर व्यक्तींबरोबर सुद्धा साजरा करून सामाजिक बांधिलकीचा धागा विद्यार्थ्यांनी बांधला आहे. शाळेच्या सुरक्षारक्षक, पोलिस बांधव, रेल्वे पोलिसांना राख्या बांधल्याने विशेषतः पोलिस बांधवांच्या चेहऱ्यावर असलेले समाधान दिसून आले.

विश्वासाचा धागा
समर्थ माध्यमिक विद्यालय केशवनगर येथील विद्यार्थिनींनी राखीपौर्णिमेचे औचित्य साधून आठवीच्या विद्यार्थ्यांनीनी चिंचवड पोलिस ठाण्यातील पोलिस दादा व ताईंना विश्वासाचा धागा म्हणजेच राखी बांधून त्यांच्याप्रती तसेच त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ केतकर, सचिव स्वरा केतकर, मुख्याध्यापिका प्रियांका एरंडे उपस्थित होते. उपस्थितांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

प. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय
नेहरूनगर येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालयातील नववीच्या व दहावीच्या विद्यार्थींनीनी तयार केलेल्या राख्या पोलिस स्टेशन व अग्निशामक दल मुख्य कार्यालय संत तुकारामनगर येथील पोलिस कर्मचारी व अग्निशामक दल सहकर्मचाऱ्यांना राखी बांधली. या कार्यक्रमास संस्था अध्यक्ष हनुमंतराव भोसले, मुख्याध्यापिका एस.आर. वाळुंज पोलिस निरीक्षक वनिता धुमाळ, पोलिस गोरख कुंभार, मनोजकुमार पांडे पोलिस कर्मचारी उपस्थित होते नवनाथ शिंदे, विशाल घोडे, सुदर्शन राठोड इतर सहकर्मचारी अग्निशामक दल, जे. एल. कांबळे, महांगडे एस, यादव जयश्री, पठाण अरमान, अनिल राठोड उपस्थित होते.

चिंचवड पोलिस स्टेशन
चिंचवड येथील सौ ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चिंचवड पोलिस स्टेशन येथे जाऊन पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमास चिंचवड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंकुश बांगर उपस्थित होते. प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या सारंगा भारत यांनी केले. पोलिसांनी कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थिनींना खाऊचे वाटप केले. व्यवस्थापक सतीश भारती यांनी आभार मानले. चिंचवड पोलिस स्टेशनचे शांतता समितीचे सदस्य सुभाष मालुसरे, धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.

जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय, ज्युनिअर कॉलेज आणि लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी विविध कल्पना वापरून वैविध्यपूर्ण राख्या बनविल्या. संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर स्कूलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका इशिता परमार, प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका प्रीती पाटील, पर्यवेक्षिका सीमा हवालदार, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थिनींनी वर्गातील विद्यार्थ्यांना राख्या बांधून त्यांचे औक्षण केले. विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींना चॉकलेट भेट दिले. रक्षाबंधनची माहिती शिक्षिका बिस्मिल्ला मुल्ला यांनी दिली. दीपाली भदाणे व दर्शना बारी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. नियोजन कीर्ती शिंपी, ज्योती मोरे, दीपाली भदाणे, पिंकी मणिकम, वासंती भोळे, सोनाली शिंदे, सोनाली मोरे, वैशाली नागणे, ममता पवार यांनी केले. शिक्षिका स्वाती तोडकर, स्मिता बर्गे, उत्तरा खटावकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

देहूरोडमधील जवानांना बांधण्यात
श्री गुरू गणेश विद्यामंदिर माध्यमिक विद्यालयात स्काऊट गाइडच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्या देहूरोड येथील जवानांना बांधण्यात आल्या. नियोजन सहशिक्षिका सुजाता भिसे, प्रियांका नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना राखी बनविण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रीतम चोपडा यांनी परीक्षण केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या देहू कॅन्टोन्मेंट
बोर्डातील जवानांना रक्षाबंधनानिमित्त स्काउट गाइडच्या विद्यार्थ्यांनी राख्या बांधून क्रांती दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमात विद्यालयाचे पर्यवेक्षक हितेंद्र लोखंडे, संतोष सुरवसे, संभाजी चव्हाण, लक्ष्मण गुंजाळ, मारुती तोत्रे, सविता ठाकूर यांनी सहभाग घेतला.

जवानांना राख्या
नेहरूनगर येथील प. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालयातील नववी व दहावीच्या विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या पोलिस स्टेशन व अग्निशामक दल मुख्य कार्यालय संत तुकारामनगर येथील पोलिस कर्मचारी व अग्निशामक दल सहकर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास अध्यक्ष हनुमंतराव भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका आर. आर. वाळुंज, पोलिस निरीक्षक वनिता धुमाळ, पोलिस गोरख कुंभार, मनोजकुमार पांडे उपस्थित होते. नवनाथ शिंदे, विशाल घोडे, सुदर्शन राठोड जे. एल. कांबळे, जयश्री यादव, पठाण अरमान, अनिल राठोड उपस्थित होते.

मुलांना शाळेकडून राख्या
शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी माध्यम निगडी शाळेत सामाजिक संवेदना जपण्याच्या हेतूने शाळेमध्ये सामाजिक रक्षाबंधन सण साजरा केला. विद्यार्थ्यांकडून गोळा करण्यात आलेल्या उपयुक्त वस्तू जनजाती वनवासी कल्याण आश्रम व अपंग विद्यालय यामुनानगर येथील गरजू मुलांना शाळेकडून देण्यात आल्या. शाळेतील विद्यार्थ्यांकडून अपंग विद्यालय निगडी येथील मुलांना राख्या बांधण्यात आल्या. मुख्याध्यापिका सविता बिराजदार यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व सांगून संस्कृत भाषेचे अध्ययन केले पाहिजे, असे मनोगतातून सांगितले. क्रांती दिनाची माहिती नववीतील विद्यार्थिनी सरोजिनी विधाते हिने सांगितली. संस्कृत दिनाची तयारी शाळेतील संस्कृत शिक्षिका डॉ. मुक्ता दाभोळकर यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतली. सामाजिक रक्षाबंधनचे गीत संगीत शिक्षिका रमा जोशी यांनी गायले. सूत्रसंचालन दहावीचा विद्यार्थी प्रथमेश ढोले व शिक्षिका अर्चना येळे यांनी केले. शाळा समिती अध्यक्ष ॲड दामोदर भंडारी यांची प्रेरणा होती.

सुरक्षारक्षकांना राखी बांधली
मॉर्डन प्री -प्रायमरी आणि प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल, यमुनानगर, निगडी राखीपौर्णिमेचा कार्यक्रम सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीमध्ये उत्साहाने पार पडला. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वत: बनविलेल्या राख्या जवानांना पाठविण्यात आल्या. विद्यार्थ्यांची राखीचे चित्र रंगवा हा उपक्रम घेण्यात आला. डॉ. अतुल फाटक व मुख्याध्यापिका तृप्ती वंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात झाला. राखी पौर्णिमेचे महत्त्व स्वाती देशपांडे यांनी सांगितली. संयोजन ज्ञाती चौधरी यांनी केले. डॉ. गजानन एकबोटे व सहकार्यवाह ज्योस्त्ना एकबोटे, उपकार्यवाह निवेदिता एकबोटे यांनी मुलांचे गोड कौतुक केले.

अपंग विद्यालयात रक्षाबंधन
मॉडर्न हायस्कूल निगडी येथील स्काऊट गाइड मुलींनी यमुनानगर निगडी येथील अपंग विद्यालयातील मुलांबरोबर रक्षाबंधन साजरे केले. मुलींनी औक्षण करून या मुलांना राख्या बांधल्या. मुलींनी अपंग विद्यालयातील विद्यार्थ्याची सर्व माहिती घेऊन त्यांना भविष्यात सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. स्काऊट गाइडच्या मुलींनी या अपंग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊ वाटप केले. प्राचार्या शारदा साबळे, पर्यवेक्षक विजय पाचारणे, आशा कुंजीर, शिवाजी अंबिके, उमर शेख उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com