संवाद माझा

संवाद माझा

Published on

संवाद माझा
रावेत परिसरात पदपथावर अस्वच्छता
रावेत -शिंदे वस्ती येथील गणपती मंदिर फुलजाई चौकाजवळ पदपथावर अस्वच्छता पसरली आहे. गणेशोत्सवात तरी कचरा सफाई होईल का? पदपथ स्वच्छ होतील ना? असे प्रश्‍न नागरिकांना पडले आहेत. पालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
- श्रीनिवास धोंगडे रावेत.
PNE25V38768

वाढलेल्या फांद्यांची छाटणी करावी
पिंपळे निळख परिसरात विशालनगर येथील जुनी व नवी नांदगुडे शाळा मार्गावर निवृती मल्हारी नांदगुडे रस्त्यावरील झाडांच्या फांद्या वीजदिव्यांच्या आड येत आहेत. या परिसरात अंधार असतो. त्यामुळे वाढलेल्या फांद्यांची छाटणी करावी. तसेच येथील पदपथांवरील पेव्हिंग ब्लॉक ठिकठिकाणी खचले आहेत. अनेक लहान मोठे-खड्डे पडले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास होतो. तरी या पदपथाची दुरुस्ती व्हावी.
- शहाजी मोरे, विशालनगर, पिंपळे निलख
NE25V38766

पुलावरील पदपथ दुरुस्त करावा
पिंपळे निलख येथे बाणेरला जोडणाऱ्या " भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुल " वरील बाणेर कडे जाणाऱ्या पदपथाची अशी दुरावस्था झाल्याने त्यावरून चालणे ही कठीण झाले आहे. या पुलावर वाहनांची वर्दळ असल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. तरी महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाने संबंधित पदपथ दुरुस्त करावा.
- सनी शिंदे, पिंपळे निलख
NE25V38765

अस्वच्छतेमुळे दुर्गंधी, डासांचा उपद्रव
आकुर्डी रेल्वे स्थानकासमोर पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण मालकीचा भूखंड आहे. तेथे गवत वाढले आहे. पलीकडे डबके साचले असून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. जवळच आकुर्डी रेल्वे स्थानक आणि समोरच आकुर्डी पीएमपीएमएल बस थांबा आहे. या ठिकाणी मोठी कार्यालयेदेखील आहेत. तरी प्रशासनाने येथे लक्ष देऊन येथील स्वच्छता करावी, अशी नागरिकांतर्फे मागणी केली जात आहे.
- उदय पाटील, निगडी
PNE25V38764

वाहतूक नियंत्रक दिवे आवश्यक
पिंपळे निलख- विशालनगर येथील डीपी रोड आहे. शहीद कामठे उद्यान चौक येथे वाहतूक नियंत्रक (सिग्नल) दिवे लावले आहेत. पण, पुढे वाकड फाटा चौकापर्यंत असे दिवे नाहीत. त्यामुळे प्रत्येक चौकात सकाळी साडेनऊ ते ११ आणि सायंकाळी पाच ते साडेसातपर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय चौकातून नागरिक किंवा विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना त्रास होत आहे. प्रशासनाने सिग्नल यंत्रणा बसविली, तर वाहतूक सुरळीत तर होईल. शिवाय रस्ता ओलांडण्यास सुलभता येईल.
- गोविंद गायकवाड, पिंपळे निलख
PNE25V38763

डांबरी रस्त्यात खड्डे, त्यात वृक्षारोपण
आपल्या शहरात रस्त्याकडेला झाडे नक्की असावीत. सोबतच महामार्गालगत, टेकड्यांवर, उद्यानांमध्ये आणि अधिक प्रदूषण असलेल्या भागांत झाडे लावावीत. पण, आकुर्डी-चिंचवड रस्त्यालगत डांबरी रस्त्यावर खड्डे व त्यात झाडे अजब आहे
- अनिल देवगांवकर, चिंचवड
PNE25V38781

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com