उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव

उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव

Published on

(राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग)
ताथवडे येथील राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या बीटेक, एमटेक, एम.सी.ए., एम.बी.ए. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव निगडी येथे करण्यात आला. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील दरी दूर करून मित्रत्वाचे नाते निर्माण करावे, असे मत आयआयटी रोपरचे संचालक डॉ. राजीव अहुजा यांनी व्यक्त केले. यावेळी टीसीएसच्या पुणे, नाशिक, गोवा विभागप्रमुख प्रसाद शास्त्री, आशिष शहा, जेएसपीएम विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवी जोशी, संचालक अनिल भोसले, महाविद्यालयाचे संचालक डॉ. एस. पी. भोसले, उपसंचालक डॉ. अविनाश बडधे, जेएमसीसी बँक अध्यक्ष रवी सावंत, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजकुंवर डुबल, विद्यार्थी परीक्षा संचालक डॉ. बी. डी. जाधव आदी उपस्थित होते. डॉ. अहुजा म्हणाले कि,‘‘जगात कुठेही जा, पण नोकर बनण्यापेक्षा नोकरी देणारे बनून मालक बना. आज आपला विकसित भारत बनत आहे. यामध्ये तरुणांचे मोठे योगदान असणार आहे. विकसित भारत घडताना भ्रष्टाचारमुक्त भारत बनावे, अशी इच्छा व्यक्त केली.’’ राजर्षी शाहू महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील नियोजनाबद्दल डॉ. संतोष भोसले यांनी माहिती दिली. याप्रसंगी ११८७ विद्यार्थ्यांना मानांकन आणि प्रमाणपत्र देण्यात आले. प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास बक्षीस म्हणून एक लाख रुपये रोख, सुवर्ण पदक आणि मानांकन आणि सर्वोत्तम विद्यार्थ्यासदेखील बक्षीस म्हणून एक लाख रुपये रोख, सुवर्ण पदक आणि मानांकन देण्यात आले. भार्गवी भेंडे आणि सुषमा तारे या विद्यार्थिनींना अकॅडमीक टॉपर आणि सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन कुशल लोढा, प्रा. रश्मी देशपांडे यांनी केले. तर, आभार डॉ. बी. डी. जाधव यांनी मानले.

‘आर्थिक नियोजन व भांडवली बाजार’ यावर जागरूकता कार्यक्रम
(डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय)
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय येथे ‘आर्थिक नियोजन आणि भांडवली बाजार’ या विषयावर जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजन सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड यांच्या वतीने करण्यात आले. प्रमुख वक्त्या सीडीएसएलच्या व्यवस्थापक (व्यवसाय विकास) अश्विनी थोरात-खेडेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनाचे महत्त्व, गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची माहिती, म्युच्युअल फंड, डीमॅट खाते, भांडवली बाजारातील संधी, डिजिटल फसवणुकीपासून बचाव व आत्मनिर्भर गुंतवणूकदार कसे व्हावे? याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे यांनी केले. नियोजन डॉ. अनिकेत गरुड, डॉ. प्रियतमा पवार आणि डॉ. आशिष चिंबाळकर यांनी केले. सूत्रसंचालन श्रेयश्री देशमुख आणि तनिष्का चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकांत नाईक यांनी केले.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
(प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय)
आकुर्डी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील १५१ विद्यार्थ्यांना हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीएसआर निधीतून १२,९४,००० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. अशी माहिती प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी दिली. याप्रसंगी हिंदुस्तान पेट्रोलियम आणि एच.पी. सेवा पश्चिम विभागीय अध्यक्ष नितीन जाधव, माजी अध्यक्ष सी. डी. कटारे, युवराज सरोदे व भारत वाघमारे तसेच उपप्राचार्य डॉ. एच. बी. सोनवणे, उपप्राचार्य डॉ. एम. बी. राठोड आदी उपस्थित होते. पश्चिम विभागीय अध्यक्ष नितीन जाधव यांनी कंपनीद्वारे मागासवर्गीय प्रवर्गातील एससी, एसटी, ओबीसी व दिव्यांग विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या शिष्यवृत्तीचा उपयोग आपल्या विविध प्रकारच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी करून घ्यावा, असे आवाहन केले. याप्रसंगी ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेले शिष्यवृत्ती विभागाचे समन्वयक डॉ. अमोल बिबे व त्यांच्या सहकारी प्राध्यापकांचे विशेष कौतुक केले. उपप्राचार्य डॉ. एच. बी. सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. आयोजनासाठी डॉ. अर्जुन डोके, प्रा. प्रसाद झिंगरे, डॉ. पंकज शिरसाळे, डॉ. मन्सूर मौलवी, डॉ. रामदास लाड तसेच सचिन इंदुरे, राजू ननावरे, संतोष दुसाने यांनी परिश्रम घेतले. हिंदुस्तान पेट्रोलियमकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दिल्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारसाहेब, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव संदीप कदम, मोहनराव देशमुख, एल. एम. पवार, ए. एम. जाधव, एचपीसीएल कंपनी तसेच एच.पी. सेवामधील पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

फ्रेशर्स वेलकम उत्साहात
(प्रीतम प्रकाश महाविद्यालय)
भोसरी येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालयामध्ये फ्रेशर्स वेलकम उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडला. नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी विविध रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. प्रा. प्रवीण म्हसके यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत कार्यक्रमाचे उद्दिष्ट आणि संस्थेची शैक्षणिक दृष्टी स्पष्ट केली. कला शाखा प्रमुख डॉ. हनुमंत शिंदे यांनी कला शाखेची तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती दिली. प्रा. विभा ब्रह्मणकर यांनी वाणिज्य शाखेचे महत्त्व पटवून दिले. अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. सदाशिव कांबळे यांनी भूषवले. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास, शिस्त व मूल्याधिष्ठित शिक्षणाबाबत मार्गदर्शन करत त्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विविध विभागप्रमुख, प्राध्यापक आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. मराठी विभागप्रमुख डॉ. विजय निकम, एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन पवार, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सवित्री वाघ, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. उमेश लांडगे, प्रा. राजेश कुंभार, प्रा. महालक्ष्मी शिरसाठ, प्रा. रेणू अग्रवाल, कार्यालयीन प्रमुख भास्कर पांडुरंग, प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com