गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

Published on

सगळे अपघात असल्याने अवतीभवती लोगो लावावा असे वाटते
---
मद्यपी मोटारचालकाच्या
धडकेत दुचाकीस्वार जखमी
पिंपरी : मद्याच्या नशेत भरधाव मोटार चालवणाऱ्याने तरुणाने समोरून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. बाणेरमधील मोहननगर परिसरातील बीटवाईज चौकात हा अपघात झाला. या प्रकरणी एका महिलेने बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी पार्थ प्रकाश पाटील (वय ३२, मोहननगर) याच्यावर गुन्हा दाखल केला. महिलेचा भाऊ अक्षय रात्री मित्राला भेटून घरी परत येत होता. अपघातात अक्षयच्या कपाळाच्या डाव्या बाजूला मार लागला.
--------------------

टेम्पोच्या धडकेत पोलिस जखमी
पिंपरी : आकुर्डीतील सुभाष पांढरकर नगर परिसरात भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार सहायय्क फौजदार किरकोळ जखमी झाले. आनंद साळवी असे त्यांचे नाव आहे. ते बिजलीनगर - निगडी रस्त्याने घरी जात होते. म्हाळसाकांत चौकाकडे ते वळत होते. त्यावेळी भेळ चौकाकडून येणाऱ्या भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला. साळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निगडी पोलिसांनी अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला.
-------------------------------
पिंपळे सौदागरमध्ये दुचाकीस्वार मृत्यूमुखी
पिंपरी : बीआरटी विलगकच्या रेलिंगला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण मृत्युमुखी पडला. पिंपळे सौदागरमधील मॅक्स शोरूम समोर हा अपघात झाला. वेदांत बबन मुसने (वय २३, रा. वरुण पार्क सोसायटी, पिंपळे सौदागर) असे मृताचे नाव आहे. तो कोकणे चौकाकडून भोसरीच्या दिशेने जात होता.
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com