क्राइम
बनावट नोटा बँकेत
जमा करण्याचा प्रयत्न
पिंपरी ः आयसीआयसीआय बँकेच्या येथील शाखेत भरणा करणाऱ्या खातेदाराकडील रकमेत बनावट नोटा आढळल्या. २० मार्च रोजी एम्पायर स्क्वेअर परिसरातील ऑटोक्लस्टर, शाखेत हा प्रकार घडला. आनंद मेडिको दुकानातील भास्कर खोपकर यांनी घाऊक दुकानदार आनंद गांधी यांच्याकडून ८० हजार १०० रुपयांची रक्कम जमा करण्यासाठी आणली होती. रोखपाल प्रवीण क्षीरसागर यांनी यंत्रातील मोजणीत २०० रुपयांच्या नऊ नोटा बनावट असल्याचे लक्षात आले. याबाबत गांधी यांना विचारणा केली असता, त्यांनी आपले अंदाजे ९० ते १०० दुकानदार असल्याने या नोटा कुणी दिल्या याची माहिती नसल्याचे सांगितले. याप्रकरणी बँकेच्या उपव्यवस्थापकाने संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून १२ ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
----------
ट्रकच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
पिंपरी ः महाळुंगे गावाच्या हद्दीतील निघोजे मार्गावर मंगळवारी भरधाव ट्रकच्या धडकेत पादचारी तरुणीचा जागीच मृत्यू झाला. रिया जयप्रकाश सहाणी (१८) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी राहुल जयप्रकाश सहाणी (२५, निघोजे, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी ट्रकचालक गजानन मारुती पानचावरे (३२, उरुळी देवाची) याला अटक केली. वळणावर त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली.
-----------
जमिनीच्या वादातून भावांना एकास मारहाण
पिंपरी ः साबळेवाडीमध्ये येथे मंगळवारी दुपारी चार जणांनी जमिनीच्या वादातून दोन भावांना मारहाण केली. याप्रकरणी राजेश काटकर (३९, साबळेवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी भरत काटकर, राजेंद्र काटकर, राहुल काटकर, स्वप्नील काटकर (सर्व रा. साबळेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपींनी जमीन उकरल्याने राजेश काटकर यांनी विचारणा केली. त्यानंतर आरोपींना शिवीगाळ सुरू केली. फिर्यादीचा भाऊ प्रशांत याने शिवीगाळ करू नका असे सांगताच आरोपी राहुलने प्रशांतच्या उजव्या पायावर लाकडी दांडक्याने मारहाण केली. फिर्यादी अडवायला गेले असता आरोपी भरतने त्यांच्या डोक्यात दगड घातला. फिर्यादीच्या आईने रोखण्याचा प्रयत्न करताच आरोपी राजेंद्रने त्यांच्या कानशिलात मारली.
------------
मित्रांकडूनच तरुणाला मारहाण
पिंपरी ः वाकडमधील छत्रपती चौकात मंगळवारी रात्री एका तरुणाला मित्रांनीच मारहाण केली. याबाबत पवन रवींद्र पाटील (२१, छत्रपती चौक, वाकड, मुळ रा. देवपूर धुळे) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी मनीष पाटील (रा. कोथरूड) आणि देवेंद्र पाटील (मुळ रा. धुळे) यांच्यावर गुन्हा दाखल केला. पवन जेवणानंतर खोलीजवळ आले असता दोन आरोपी दुचाकी घेऊन उभे होते. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत शर्ट पकडून कानशिलात मारले. चष्म्याची काच फुटून फिर्यादीच्या डोळ्याच्या बाजूला दुखापत झाली. आरोपी मनीषने पवन यांच्या हातातील स्टीलच्या कडे त्यांच्या डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
-----------
दारूविक्री प्रकरणी तरुणीवर गुन्हा
पिंपरी ः चाकणजवळील गोणवडी गावात गावठी दारू बेकायदेशीरपणे विकणाऱ्या २० वर्षीय तरुणीवर मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र पोलिसांची चाहुल लागताच ती पळून गेली. भाम नदीच्या कडेला स्मशानभूमीजवळील या तरुणीने दहा हजार ५०० रुपये किमतीची १०५ लिटर गावठी दारू विक्रीसाठी जवळ बाळगली होती. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल सुधीर दांगट यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
--------------
कंपनीच्या पैशांची अफरातफर
पिंपरी ः भुगावमधील ग्रंथा एन्टरप्रायझेस कंपनीतील कर्मचाऱ्याने पैशांची अफरातफर केल्याची घटना उघडकीस आले. १३ जून ते १९ जुलै दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी विवेक जोरी (वय ३३) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून योगेश झांबरे (रा. नऱ्हे ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. झांबरेने फिर्यादीचा विश्वास संपादन औरंगाबादच्या एका कंपनीला
आठ लाख १२ हजार ३९३ रुपयांचे बांधकाम साहित्य दिले. ही रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता त्याने स्वतःकडे ठेवली.
-----------
नोकरीच्या आमिषाने दोघांना फसविले
पिंपरी ः नामवंत आयटी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी देण्याच्या आमिषाने दोन आरोपींनी दोन तरुणांची पाच लाख ४० हजार रुपयांना फसवणूक केली. २२ जून ते आठ जुलै दरम्यान सुसगावमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी श्रीनिवास मंगन्नाकरुर (२६, रा. सुसगाव) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून साई केलुरी, पौर्णिमा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी एका कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागात अधिकारी असल्याचे भासवले. त्यांनी फिर्यादीकडून चार लाख ६५ हजार रुपये, तर त्यांचा मित्र अभिषेक तळेकरकडून ८० हजार असे एकूण ५ लाख ४० हजार रुपये घेतले. त्यानंतर आरोपींनी बनावट नियुक्तीपत्र पाठवून नोकरी त्यांची फसवणूक केली.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.