पिंपरी-चिंचवड
रावेतमध्ये सेंद्रीय शेतीमधून दिवसाआड दोन किलोहून भाजीपाला
किवळे, ता. १४ : शहरी भागांत शेती नष्ट होत चालली असल्याच्या दाव्याला रावेतमधील शेतकरी राजेंद्र भोंडवे यांनी छेद दिला आहे. त्यांनी घराजवळ चार गुंठ्यांमध्ये दिवसाआड दोन किलोहून अधिक भाजीपाला घेत आहेत. हा भाजीपाला पूर्णतः स्वतःच्या कुटुंबासाठीच वापरला जात आहे.
या सेंद्रिय भाजीपाल्यामध्ये भेंडी, मेथी, शेपू, गवार, फ्लॉवर, कोबी, गाजर, बीट आदींचा समावेश आहे. एक भाजी निघाली की दुसऱ्या पिकाची तयारी लगेच सुरू होते, असे राजेंद्र भोंडवे सांगतात. रासायनिक खते टाळून शेणखत वापरल्याने भाजी ताजी मिळत आहे. घरातील व शेतीसाठी मदत करणाऱ्या दुसऱ्या कुटुंबासह १२ सदस्यांचे ताज्या भाज्यांच्या माध्यमातून वर्षभर पोषण होत आहे.
KIW25B04833