बाळा जो जो रे कुळभूषणा । श्रीनंदनंदना ।
फोटो
40355
-----
पिंपरी, ता.१६ ः ‘बाळा जो जो रे कुळभूषणा । श्रीनंदनंदना । निद्रा करी बाळा मनमोहना । परमानंदा कृष्णा,’ असा पाळणा गात श्रीकृष्ण जन्माष्टमी थाटामाटात साजरी करण्यात आली.
बाळकृष्णाचा पाळणा हलवून भगवान श्रीकृष्णाच्या विविध लीलांचे गोडवे मध्यरात्री गायले गेले. कान्हाच्या सेवेत तल्लीन होऊन भाविकांनी उपवास केला आणि बाळकृष्णाला फराळाचा नैवेद्य दाखवला. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त रात्री बारा वाजता घराघरांत तसेच मंदिरांत असंख्य भक्तांनी कृष्णजन्म साजरा केला. देवकी, वासुदेवासह सर्वांच्या नावांचा उच्चार केला. रावेत येथील इस्कॉन मंदिरात भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या मूर्तीची मनोहारी सजावट करण्यात आली होती. ‘हरे कृष्णा हरे कृष्णा’चा गजर करण्यात आला.
नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला नॉव्हेल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार अमित गोरखे, संचालक विलास जेऊरकर, शाळेच्या व्यवस्थापक प्रिया गोरखे, तांत्रिक विभाग प्रमुख समीर जेऊरकर आणि मुख्याध्यापिका मृदुला गायकवाड उपस्थिती होते. यावेळी शाळेतील लहानग्यांनी जन्माष्टमीवर आधारित नाट्यप्रयोग सादर केला.
बालगोपालाची श्रीकृष्ण जन्माष्टमी
निगडीतील यमुनानगरमधील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी राधा , कृष्ण, गोप गोपिकांच्या वेशभूषेत आले होते. मुख्याध्यापिका तृप्ती वंजारे व शिक्षकांच्या हस्ते दहीहंडीची पूजा करण्यात आली. लीना पगारे यांनी जन्माष्टमीची कथा सांगून दहीहंडीच्या गमतीजमती सुद्धा सांगितल्या. बालचमूंनी तीन ते चार थर रचून अतिशय जोमाने दहीहंडी फोडली. यावेळी संस्थेचे चेअरमन श्यामकांत देशमुख, यशवंत कुलकर्णी, शाळेचे व्हीजीटर अतुल फाटक आणि शशिकांत ढोले उपस्थित होते.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.