मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध क्लुप्त्या

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध क्लुप्त्या

Published on

पिंपरी, ता. १५ ः महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांकडून मतदारांशी संपर्क साधण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवल्या जात आहेत. आता दिवाळी फराळ, मिठाई वाटपाबरोबरच विविध स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करून आणि उपक्रम राबवून बक्षिसांच्या बहाण्याने मतदार ‘राजा’ला खूष करण्याचा प्रयत्न केले जात आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका निवडणूक ३१ जानेवारी २०२६ पूर्वी होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे माजी नगरसदस्यांसह नवीन इच्छुकही तयारीला लागले आहेत. निवडणूक लढविणार असलेल्या प्रभागांमध्ये दिवाळीनिमित्त विविध स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यासाठी मोठमोठी बक्षिसे जाहीर केली आहेत. काहींनी दिवाळी फराळ कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे. त्यासंदर्भातील फलक मोक्याच्या ठिकाणी लावले आहेत. सोशल मीडियावर संदेश पाठवले जात आहेत. त्यांवर स्वतःच्या नावासह छायाचित्रही असून राजकीय पक्षाचे नाव आणि नेत्यांचीही छायाचित्रे आहेत. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दिवाळीचा मुहूर्त साधत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अवलंबला आहे.

मतदान नोंदणीसाठी आग्रह
मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नवीन मतदार नोंदणी, नावात दुरुस्ती, आपल्याच प्रभागात नाव आहे की नाही याची खात्री करून घेणे, असे संदेश मतदारांना पाठवले जात आहेत. त्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी, ओळखीचे रहिवासी यांचा वापर केला जात आहे. त्यांच्यामार्फत व्हॉटसॲपच्या माध्यमातून नाव असलेल्या मतदार यादीतील पानाचे छायाचित्र काढून मतदारांना पाठवले जात आहे. त्यात काही चुकीचे नाही ना? अशी विचारणा करत दुरुस्तीची सूचनाही केली जात आहे.

आरक्षणामुळे सावधानताही
महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झालेली आहे. मात्र, महिला, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) उमेदवारांसाठी जागांची आरक्षण सोडत कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे प्रभागात आरक्षण पडल्यास पर्याय म्हणून इच्छुकांनी आपल्या सौभाग्यवतींचे छायाचित्रही दिवाळी शुभेच्छा व विविध कार्यक्रमांच्या आयोजनाच्या फलकांवर झळकावले आहेत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच या हेतूने सावधानता बाळगली जात आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com