क्राइमच्या बातम्या

क्राइमच्या बातम्या

Published on

वीज कंत्राटदाराला ८६ लाखांचा गंडा
पिंपरी ः एका कंपनीच्या प्रतिनिधीने वीज कंत्राटदाराला सुमारे ८७ लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी संदेश थिटे (वय ५०, रा. औंध) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून प्रचित इंगवले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे आरोपीने फिर्यादीला भोसरी बापुजी बुवा चौक ते पी. एम. टी. चौकापर्यंतच्या रस्त्याच्या विद्युतविषयक कामाची वर्क ऑर्डर दिली होती. फिर्यादीने काम वेळेत पूर्ण केले. महानगरपालिकेनेही पूर्णत्वाचा दाखला दिला. त्यानंतर फिर्यादीने कामाची बिले महानगरपालिकेत जमा केली. याची एक कोटी ९९ लाख ९३ हजार १४५ रुपये ही इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बँक खात्यावर जमा झाली. त्यानंतर कंपनीने फिर्यादीला केवळ ६३ लाख १२ हजार ४२३ रुपये दिले. उर्वरित ८६ लाख ४४ हजार २१९ रुपये रक्कम त्यांना देण्यात आली नाही.
-------------
ऑनलाइन कर्जाच्या नावाखाली फसवणूक
व्हॉट्सॲप आणि फोनकॉलद्वारे संपर्क साधून ऑनलाइन कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली एका तरुणाला फसविण्यात आले. याप्रकरणी करण राजपुरोहित (३३, रा. फुगेवाडी) यांनी दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने फिर्यादीकडून कागदपत्रे मागवून त्यांच्या संमतीशिवाय २७ हजार रुपयांचे कर्ज घेतले. याशिवाय पाच लाख रुपयांच्या कर्जासाठी प्रक्रिया शुल्क म्हणून २३ हजार ८१४ रुपये ऑनलाइन ट्रान्स्फर करायला लावले. फिर्यादीला ३० सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत एकूण ३० हजार ५९१ रुपयांना फसविण्यात आले.
-------------
भांडण सोडविणे पडले महागात, तरुणाला मारहाण
मित्राला मारहाण होत असल्याने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केल्याच्या रागातून तीन जणांनी एका तरुणाला लाकडी दांडका, कटर आणि चॉपरने मारहाण केली. निगडीतील ओटास्कीम परिसरातील अंकुश चौकात हा प्रकार घडला. या प्रकरणी अल्तमश खान यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मोसिन शेख, इमरान, मुजाहिद पटवेगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
------------
रागाने बघण्यावरून पाच जणांची मारहाण
रागाने बघितल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने वाद घालून मारहाण सुरू केली. फिर्यादीने प्रतिकार करताच चार साथीदारांना बोलावून लाकडी दांडके, कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. बावधनमधील स्टार अल्टायरमधील वाहनतळावर हा प्रकार घडला. याप्रकरणी सुहीत कलुबर्मे यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ऋत्विक मिरघे, आशिष मिरघे व इतर तीन साथीदारांवर बावधन पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
------------
मुलाच्या गळ्यातील सोने
हिसकावणाऱ्याला पकडले
पिंपरी ः भाजी खरेदी करणाऱ्या महिलेच्या मुलाच्या गळ्यातील सोन्याचे बदाम हिसकावलेल्या रिक्षाचालकाला लोक तसेच गस्तीवरील पोलिसांनी पकडले. किवळे येथील के. व्हीला सोसायटीसमोरील भाजीबाजारात मंगळवारी हा प्रकार घडला. याप्रकरणी याबाबत दत्तात्रय बेलकर यांनी देहुरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून कैलास खाडे याला अटक करण्यात आली. पाला मार्केट येथे घडली. मुलाच्या गळ्यात काळ्या दोऱ्यात बांधलेले २५ हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे बदाम हिसकावून पळून जाण्याचा आरोपीचा प्रयत्न फसला.
-----------
पिस्तूल बाळगल्याने एकास अटक
पिंपरी ः पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे बेकायदा बाळगल्याने एका तरुणाला मंगळवारी सोमाटणे फाटा परिसरातील परंदवाडी मार्गावरील श्री चौराई सिटीसमोर, अटक करण्यात आली. अजय साळुंके (वय २३, रा. नेरे दत्तवाडी, मुळशी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ५२ हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त केले. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल गणेश सावंत यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com