वाचन प्रेरणा दिनाद्वारे डॉ. कलाम यांना अभिवादन
पिंपरी, ता. १६ ः थोर शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी उपायुक्त भदाणे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी सुरेंद्र देशमुखे, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम, उपलेखापाल संतोष कुदळे, अभिजीत डोळस, सामाजिक कार्यकर्ते अजीझ शेख, अझहर खान, रफीक कुरेशी, तबस्सुम सय्यद, विद्यासागर गायकवाड, सलीम सय्यद, युसूफ कुरेशी, वायिद कुरेशी, सचिन महाजन तसेच कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय जैन संघटना
संत तुकारामनगर येथील भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालयात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा केला. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक संजय जाधव होते. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध गोष्टींची पुस्तके, मासिके व वर्तमानपत्रे वाचून वाचनाचा आनंद घेतला. वाचनातून नवीन माहिती मिळते व कल्पनाशक्ती विकसित होते, हे त्यांनी अनुभवले. या कार्यक्रमात अरुणा धिवार यांनी विद्यार्थ्यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाची माहिती दिली. वाचनाचे महत्त्व समजून सांगताना त्यांनी वाचन म्हणजे ज्ञानाचा खजिना असे सांगितले. शिक्षिका दीपिका सावंत यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून शाळेला विविध गोष्टींची पुस्तके भेट दिली. आभार कुमठेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शैला बर्वे, स्नेहलता वाडेकर, प्रदीप बोरसे, विलास गुंजाळ, माने सायली, सुवर्णा जाधव, सविता अमोलिक व भाग्यश्री भोईर यांनी परिश्रम घेतले.
प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय
प्रा.रामकॄष्ण मोरे महाविद्यालय ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. ग्रंथालय अभ्यासिकेमध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्यांनी केले. डायमंड प्रकाशन पुणे, फॉरवर्ड बुक व अंधश्रद्धा निर्मूलन समिती ग्रंथ दिंडी यांनी पुस्तकांचे स्टॉल प्रदर्शनात लावले होते. शंभर विद्यार्थी व प्राध्यापकांनी प्रदर्शनास भेट देऊन पुस्तकांची निवड केली. पुस्तक खरेदी केली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. खंडागळे, उपप्राचार्य डॉ. हिरालाल सोनवणे, उपप्राचार्य डॉ. मधुकर राठोड, डॉ. प्रा.सुर्यकांत पवार, प्रा. संजय भोई, प्रा. दीपक येवले, प्रा. विदुला व्यवहारे, प्रा. सुचित्रा परदेशी, प्रा. सुदर्शन लखदिवे, प्रा. शिल्पागौरी गणपुले, प्रा. वर्षा श्रीराम, प्रा. अविनाश काळे, प्रा. डॉ. संतोष वाळके, प्रकाश म्हसे उपस्थित होते. नियोजन ग्रंथपाल प्रा. अंकुश जाधव, उज्वला लोंढे, सचिन इंदुरे, राजू ननावरे, सुखदेव लोखंडे, रणजित चव्हाण, मंगल जंबूकर यांनी मार्गदर्शनाखाली केले.
मॉडर्न हायस्कूल
मॉडर्न हायस्कूल निगडी येथे वाचन प्रेरणा दिन साजरा केला. नवेश पाटील मुख्याध्यापिका शारदा साबळे, पर्यवेक्षक विजय पाचारणे, शिवाजी अंबिके, मीना अधिकारी, मनीषा बोत्रे, जयश्री चव्हाण, सुनंदा खेडेकर, अमृता गायकवाड उपस्थित होत्या. सूत्रसंचालन शिवाजी अंबिके यांनी केले. उपक्रमाचे कौतुक कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. श्यामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष प्रा. मानसिंग साळुंके, प्रमोद शिंदे, राजीव कुटे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.