प्रांतोप्रांतीची दीपावली ओरिसा

प्रांतोप्रांतीची दीपावली ओरिसा

Published on

प्रांतोप्रांतीची दीपावली ः ओडिशा ः लोगो
---
लीड
कोणी दीपावली म्हणतं तर कोणी दिवाळी. शब्द काहीही असला तरी सण एकच तो म्हणजे प्रकाशाचा. सर्वत्र आनंद आणि हर्षोल्हासाचा. त्याचा प्रारंभ शुक्रवारपासून (ता. १७) अर्थात वसुबारसपासून होत आहे. उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमधील प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सण साजरा करणार आहे. यामध्ये महाराष्ट्रासह विविध प्रांतांतील नागरिकांचाही समावेश आहे. कारण, नोकरी, व्यवसायानिमित्त अनेक जण देशाच्या कानाकोपऱ्यातून शहरात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे सण-उत्सवाच्या प्रांताप्रांतातील प्रथा-परंपरा बघायला मिळत आहेत. दिवाळीनिमित्त त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न आजपासून....
---
भगवान राम अयोध्या परतीचा आनंदोत्सव

भोसरीतील प्रदीप स्वाइन यांनी जागवल्या ओडिशातील दिवाळीच्या आठवणी

पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १६ ः दीपावली हा प्रकाशाचा सण आहे. प्रकाशाचा उत्सव आहे. भगवान विष्णू यांनी नरकासुराचा वध केला आणि भगवान राम चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले, त्या दिवसाचा आनंदोत्सव म्हणजे दिवाळीचा सण. ओडिशामध्ये आश्विन अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो, मूळचे ओडिशातील रहिवासी असलेले आणि दिघीतील श्री जगन्नाथ मंदिराचे विश्‍वस्त प्रदीप स्वाइन सांगत होते.
पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक ओडिशातील बांधवांची समस्त प्रवासी ओडिआ समाज संघटना आहे. त्यामाध्यमातून सर्व बांधव त्यांचे सण-उत्सव आनंदात साजरा करतात. त्यात जगन्नाथ रथयात्रा आणि दीपावलीचा समावेश आहे. दीपावलीबाबत स्वाइन म्हणाले, ‘‘दिवाळीच्या आदल्या दिवशी भगवान विष्णूने नरकासुराचा वध केला म्हणून त्याला नरकचतुर्दशी म्हटले जाते. नरकासुराचा वध केला आणि हजारो महिलांच्या ज्वाला सोडल्या म्हणूनच दिवाळी साजरी केली जाते. शिवाय, १४ वर्षांचा वनवास पूर्ण केल्यानंतर भगवान राम अयोध्येत परतले तो दिवस म्हणजे आश्विन अमावस्या. अयोध्येतील नागरिकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी दिवे लावले. म्हणूनच दिवाळी साजरी केली जाते, अशा पौराणिक कथांवरून दिसते. तसेच, अशाच एका कथेनुसार भगवान विष्णूने हिरण्यकश्यपूचा वध केल्याच्या स्मरणार्थही दिवशी दिवाळी साजरी केली जाते.’’

कालीमाता आणि लक्ष्मीपूजन
ओडिशामध्ये परंपरेनुसार आजही दिवाळी सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरी करतात. आम्ही ती परंपरा महाराष्ट्रातही जपण्याचा प्रयत्न करतोय. शिवाय, जगन्नाथ रथयात्रा दरवर्षी दिघी, भोसरी परिसरातून काढली जाते. दिवाळीच्या दिवशी देवी कालिका माता, लक्ष्मी माता यांची पूजा केली जाते. देवी कालीच्या शांत आणि उग्र स्वरूपाची ही पूजा असते. या दिवशी रात्री घरात आणि मंदिरात मोठ्या प्रमाणात दिवे लावले जातात. सर्व परिसर प्रकाशाने लखलखीत केला जातो.

पूर्वजांचे स्मरण
काही कारणास्तव पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे श्राद्धविधी करू शकत नाहीत, ते भाविक दिवाळीच्या दिवशी श्राद्ध करतात. त्याला महालया श्राद्ध म्हणतात, असेही स्वाइन यांनी सांगितले. शिवाय, ओडिशातील प्रत्येक घर आणि कुटुंबातील प्रत्येकजण ताग व दोरीमध्ये अग्नी पेटवून ते आकाशाकडे दाखवतात. यावेळी पूर्वजांना आवाहन करतात, त्यांना आळवतात की, ‘कृपया या आणि आम्हाला आशीर्वाद द्या.’

दिवाळीच्या दिवशी ओडिशातील प्रत्येक घरात सर्व प्रकारच्या मिठाई तयार केल्या जातात. घराला दिव्यांनी सजवले जाते. मिठाई व भेटवस्तू एकमेकांना दिल्या जातात. फटाके वाजवले जातात. सर्वत्र आनंद आणि उत्सव असतो.
- प्रदीप स्वाइन, विश्वस्त, श्री जगन्नाथ मंदिर दिघी आणि (समस्त प्रवासी ओडिआ समाज पिंपरी चिंचवड शहर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com