सकाळ संवाद

सकाळ संवाद

Published on

सिग्नलवरील फांद्या छाटा
यमुनानगर पोलिस चौकीकडून भोसरीकडे जाताना दुर्गा चौकातील दोन्ही सिग्नल झाडांच्या फांद्या व बॅरिकेडस् खांबामुळे लांबून दिसत नाहीत. तरी योग्य ती कार्यवाही व्हावी. उजवीकडील सिग्नल दिवा मध्य खांबांवर स्थलांतरित करावा.
- सारंग कुलकर्णी, यमुनानगर, निगडी
PNE25V61007

नाल्यात पडलेले झाड हटवा
दिघी रस्ता परिसरातील गंगाोत्री पार्क जवळ असलेल्या एमएम लँडमार्क सोसायटीच्या मागील बाजूच्या नाल्यात एक मोठे झाड अचानक कोसळल्याने पाणी तुंबण्याची भीती निर्माण झाली आहे. झाडाचे काही भाग सोसायटीच्या संरक्षक भिंतीच्या दिशेने झुकले आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कुणी जखमी झाले नाही. झाड नाल्यात पडल्याने परिसरातील घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. झाड खूप मोठे असल्याने ते काढण्यासाठी तातडीने मोठ्या यंत्रसामग्रीची गरज आहे. पाऊस झाल्यास मोठी समस्या उद्‍भवू शकते.
- नितीन लावंड, दिघी
PNE25V61006

एम.बी कॅम्प रस्त्यावर खड्डे
देहूरोडकडून मुकाई चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एम.बी. कॅम्प ते मुकाई चौक या रस्त्यावर असंख्य खड्डे आहेत. इतके खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे ? हा प्रश्‍न पडतो. विकासनगरमधील अंबिका रस मिठास ते अंबिका ट्रेडर्स या दुकानांजवळील दोन गतिरोधकांची दुरवस्था झाली आहे. तेथे वाहन चालकाने अचानक ब्रेक मारल्यास छोटा मोठा अपघात होऊ शकतो. या अगोदरही अपघात झालेले आहेत. तरी याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन रस्त्याची केवळ तात्पुरती डागडुजी न करता पूर्ण डांबरीकरण करावे.
- हिरामण येवले, विकासनगर, किवळे
PNE25V61009

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com