आरटीओ कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा इशारा

आरटीओ कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा इशारा

Published on

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १८ ः प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी आपल्या मागण्या येत्या आठवड्यात मान्य न झाल्यास २७ ऑक्टोबरपासून बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे.
राज्यात ५९ प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत. यामध्ये वर्ग तीन आणि चारचे हजारो कर्मचारी कार्यरत आहेत. गेली अनेक वर्ष नोकरभरती न झाल्याने अनेक पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र राज्य सेवा आयोगामार्फत (एमपीएससी) पदभरती होते, पण २०१८ पासून परिवहन आयुक्त कार्यालयाने एमपीएससीकडे रिक्त पदे भरण्यासाठी मागणीच केलेली नाही. त्यामुळे अनेक पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. नवीन पदांच्या सेवा प्रवेश नियमांविषयी शासन दरबारी गेल्या तीन वर्षांपासून निर्णय रखडला आहे. त्यामुळे पदोन्नतीने आणि सरळसेवेने भरली जाणारी पदेही रिक्त आहेत. अनेक पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण येत आहेत. पदोन्नती रखडल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी १० ऑक्टोबर रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. त्यावेळी आठवडाभरात कार्यवाही करून प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सरनाईक यांनी दिले होते. पण, परिवहन आयुक्तांकडून कार्यवाही होत नसल्याने कर्मचारी संघटनांनी हा इशारा दिला आहे.
---------
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर गुरुवारी परिवहन आयुक्तांकडे कार्यवाहीबाबत आढावा घेतला. त्यावेळी आयुक्तांनी सकारात्मक भूमिका असल्याचे कळवले. प्रत्यक्ष मात्र कार्यवाही होताना दिसून येत नसल्याने २७ ऑक्टोबर पासून साखळी उपोषण करण्यावर आम्ही ठाम आहोत.
- सुरेंद्र सरतापे, सरचिटणीस, आरटीओ कर्मचारी संघटना
----------
प्रमुख मागण्या
- रिक्त जागा तत्काळ भरा
- विविध पदांवर पदोन्नती द्या
- राज्यातील परिवहन विभागातील कामकाजात एकसूत्रता येण्यासाठी कळसकर समितीने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी करा
- सरळसेवा आणि पदोन्नतीने भरण्यात येणाऱ्या जागा लवकर भरा
- आश्‍वासित प्रगती योजनेचा आकृतीबंधाप्रमाणे लाभ द्या
---

पदे - रिक्त जागा
कार्यालयीन अधिक्षक - १२०
प्रशासकीय अधिकारी - ७५
सहाय्यक मोटार वाहन अभियोक्ता - १४
निम्नश्रेणी लघुलेखक - १६
वरिष्ठ लिपिक - १०
कनिष्ठ लिपिक - २८
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com