सकाळ संवाद
सकाळ संवाद
--
उर्से फुडमॉलजवळील
शौचालयाच्या दुरुस्ती करावी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील उर्से फुडमॉलजवळील शौचालयाची दुरवस्था झाली आहे. परिसरात गवत वाढले आहे. भिंतींना तडे गेले आहेत. आतील फरश्या तुटल्या आहेत. तावदानांच्या काचा फुटल्या आहेत. टाकाऊ अन्नपदार्थ, कचरा, प्लास्टिक बाटल्या, तुटकी भांडी टाकण्यासाठी जागेचा वापर केला जातो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. अनेक नागरिक तिथे कचरा टाकतात. उंदरांचा वावर वाढला आहे. गवतामुळे साप असण्याचाही धोका आहे. शौचालयाचा वापर करता येत नसल्याने प्रवासी उघड्यावरच लघुशंका करतात. शौचालयाची दुरुस्ती गेल्या अनेक वर्षांपासून झालेली नाही. फुडमॉलजवळील छोटे शौचालय प्रवासी संख्येच्या मानाने पुरेसे नाही. त्यांच्या अडचणी विचारात घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने शौचालयाची तातडीने दुरुस्ती करावी.
- सुभाष धामणकर, अध्यक्ष, शेतकरी कृती समिती
---
फोटो
61278
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.