‘पीसीएमसी रनाथॉन’मध्ये धावले तीन हजार स्पर्धक
पिंपरी, ता. २० : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने निगडी रोटरी क्लबच्या वतीने निगडी येथे आयोजित ‘पीसीएमसी रोटरी मिराए अॅसेट म्युच्युअल फंड’ रनाथॉनमध्ये सुमारे तीन हजार नागरिक धावले.
यावेळी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, विश्वविक्रमी धावपट्टू आशिष कसोदेकर, आर्यनमॅन विक्रांत गोटगे, मिराए असेटच्या वरिष्ठ उपाध्यक्षा सुनंदा बोरठाकुर, वरिष्ठ उपाध्यक्ष मखदूम अन्सारी, पुणे व्यवस्थापक मयूर धानोपिया, तानाजी फेम अभिनेत्री इलाक्षी गुप्ता, रोटरी क्लबचे प्रांतपाल संतोष मराठे, नियोजित प्रांतपाल नितीन ढमाले, निगडी क्लबचे अध्यक्ष केशव मानगे, रनाथॉन संचालक शशांक फडके, सचिव गुरुदीपसिंग आदी उपस्थित होते.
मानगे म्हणाले, ‘‘यंदा रनाथॉनचे १४ वे वर्ष आहे. या उपक्रमातून मिळालेला निधी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि महिला सक्षमीकरण यावर खर्च केला जातो.
तर, शशांक फडके म्हणाले, ‘‘यावर्षी आम्हाला मिराए अॅसेट म्युच्युअल फंड हे टायटल प्रायोजक म्हणून लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे रोटरी आणि कॉर्पोरेट क्षेत्र एकत्र येऊन समाजात कायमस्वरूपी बदल घडवू शकतील.’’ यावेळी महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.
स्पर्धा सकाळी साडेपाच वाजता सुरू झाली. पुरुष व महिला दोन्ही गटांसाठी हाफ मॅरेथॉन (२१ कि.मी.), १० कि.मी. आणि ५ कि.मी. अशा तीन गटात पार पडली.
स्पर्धेतील गट आणि विजेते
- २१ कि.मी. पुरुष गटात वय ४५ च्या पुढील सावळाराम शिंदे, संतू जिवा वारडे, समीर कोयला तर महिला गटामधून पुजा ओसवाल, मीना पवार, पुजा महेश्वरी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतिय क्रमांकाची पारितोषिके पटकावली. २१ कि.मी. (वय ४५ च्या आत पुरुष) प्रवीण कांबळे, नीलेश अर्सेकर, राम लोखंडे आणि महिलांमध्ये प्रियंका ओसका, निशा पासवान, श्वेता पाटील यांनी बाजी मारली.
- १० कि.मी. (वय ४५) धावणे स्पर्धेत पुरुष गटामध्ये आबासाहेब राऊत, रमेश खरमाळे, शितेश महेश्वरी आणि महिला गटामध्ये पूनम जैन यांनी पारितोषिके जिंकली. तर, १० किमी (वय ४५ च्या आत) पुरुष गटामध्ये अभिषेक देवकाते, दिलीप सिंग, वैभव शिंदे आणि महिला गटामध्ये अमृता पटेल, रिंकी सिंग, खुशी सिंग यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतिय क्रमांकाची पारितोषिके पटकावली.
- ५ कि.मी. धावणे स्पर्धेत (वय ४५ वरील पुरुष) रमेश चिवळकर, वसंत देसाई, अशोक काचोळे यांनी तर महिला गटामध्ये लोपमुद्रा कर, वृषाली शिंदे, विशाखा कोते यांनी पारितोषिके जिंकली. तर, वय वर्ष ४५ च्या आतील पुरुष गटातील अतुल बर्डे, निलेश यादव, अभिनय यादव आणि महिला गटातील
यामिनी ठाकरे, अमृता मांडवे, आश्लेषा झोळेकर यांनी पारितोषिके पटकावली.
- कॉर्पोरेट ५ कि.मी. खुला गटात अनुज करकरे, आकाश हिरवे, मयूर काकडे आणि महिलांमध्ये सुवर्णा जाधव, प्रांजल लाहे, गौरी बढे यांनी बाजी मारली. तर, कॉर्पोरेट खुला गटात सामूहिक संघ एनप्रो इंडस्ट्रीज, विनिल हायटेक, रिषभ इंडस्ट्रिज यांनी पारितोषिके जिंकली.
-------