‘पीसीएमसी रनाथॉन’मध्ये धावले तीन हजार स्पर्धक

‘पीसीएमसी रनाथॉन’मध्ये धावले तीन हजार स्पर्धक

Published on

पिंपरी, ता. २० ः महापालिकेच्या सहकार्याने निगडी रोटरी क्लबतर्फे निगडीत आयोजित ‘पीसीएमसी रोटरी मिराए अ‍ॅसेट म्युच्युअल फंड’ रनाथॉनमध्ये सुमारे तीन हजार नागरिक धावले.
महापालिका उपआयुक्त अण्णा बोदडे, विश्वविक्रमी धावपट्टू आशिष कसोदेकर, आर्यनमॅन विक्रांत गोटगे, मिराएच्या वरिष्ठ उपाध्यक्षा सुनंदा बोरठाकुर, वरिष्ठ उपाध्यक्ष मखदूम अन्सारी, पुणे व्यवस्थापक मयूर धानोपिया, अभिनेत्री इलाक्षी गुप्ता, रोटरीचे प्रांतपाल संतोष मराठे, नियोजित प्रांतपाल नितीन ढमाले, निगडी क्लबचे अध्यक्ष केशव मानगे, रनाथॉन संचालक शशांक फडके, सचिव गुरुदीपसिंग आदी उपस्थित होते. स्वच्छतेची शपथ घेतली. पुरुष व महिला दोन्ही गटांसाठी हाफ मॅरेथॉन २१, १० व पाच किलोमीटर अशा तीन गटात स्पर्धा झाली.

स्पर्धेतील गट आणि विजेते
- २१ किलोमीटर पुरुष वय ४५ पेक्षा अधिक ः सावळाराम शिंदे, संतू वारडे, समीर कोयला. महिला ः पूजा ओसवाल, मीना पवार, पूजा महेश्वरी. वय ४५ पेक्षा कमी पुरुष ः प्रवीण कांबळे, नीलेश अर्सेकर, राम लोखंडे. महिला ः प्रियंका ओसका, निशा पासवान, श्वेता पाटील
- १० किलोमीटर धावणे पुरुष वय ४५ पेक्षा अधिक ः आबासाहेब राऊत, रमेश खरमाळे, शितेश महेश्वरी. महिला ः पूनम जैन. वय ४५ पेक्षा कमी पुरुष ः अभिषेक देवकाते, दिलीप सिंग, वैभव शिंदे. महिला ः अमृता पटेल, रिंकी सिंग, खुशी सिंग
- ५ किलोमीटर धावणे ः ४५ वर्षांवरील पुरुष ः रमेश चिवळकर, वसंत देसाई, अशोक काचोळे. महिला ः लोपमुद्रा कर, वृषाली शिंदे, विशाखा कोते. ४५ वर्षांखालील पुरुष ः अतुल बर्डे, निलेश यादव, अभिनय यादव. महिला ः यामिनी ठाकरे, अमृता मांडवे, आश्लेषा झोळेकर
- कॉर्पोरेट ५ किलोमीटर खुला गट पुरुष ः अनुज करकरे, आकाश हिरवे, मयूर काकडे. महिला ः सुवर्णा जाधव, प्रांजल लाहे, गौरी बढे.
- कॉर्पोरेट खुला गट सामूहिक संघ ः एनप्रो इंडस्ट्रीज, विनिल हायटेक, रिषभ इंडस्ट्रिज
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com