संवाद नागरीकांचा

संवाद नागरीकांचा

Published on

धोकादायक झाड काढा
चिखली येथील कोयनानगरमधील सेवा रस्त्यावर एक झाड असून नेहमी त्याच्या फांद्या रस्त्यावर तसेच माझ्या घराच्या कंपाउंडमध्ये पडत असतात. परवाच मोठी फांदी पडली. शाळकरी मुलगा नशिबाने वाचला. आम्हाला सुद्धा मागे जायला भीती वाटते. ते झाड खूप कमकुवत असून थोडा पाऊस झाला तरी फांद्या पडतात. हे झाड खूप धोकादायक झाले असून रस्त्यावर शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिलांची वर्दळ असते. महापालिकेला कळवून देखील तर फक्त एक-दोन फांद्या काढतात आणि जातात.
- संजय घाडगे, कोयनानगर, चिखली
PNE25V23737

पीएमपीएमएलचा अशिक्षितपणा
आळंदीच्या दिशेने जाणाऱ्या बसवर पीएमपीएमएलने स्टिकर अशा जागेवर चिकटवले आहे. जेणेकरून प्रवाशांना ती बस कोणत्या मार्गावरून धावते आहे, हे कळणार नाही. साईन बोर्ड झाकले गेले आहे. थोडेतरी तारतम्य बाळगावे. उगाच स्टिकर लावून असे काम करण्यात स्वतःचे अशिक्षितपणा दाखवू नये.
- डॉ. अमितकुमार हिरेमठ, दिघी
PNE25V23739

पालकांकडून बेशिस्त पार्किंग
मोशी प्राधिकरणमधील पेठ क्र.६ मधील साधू वासवानी शाळेत वाहनतळाची सोय केलेली नाही. सकाळी अणि दुपारी खूप गर्दी असते. हॉर्नचा आवाज असतो. शेजारील नागरिकांना याचा त्रास होतो. रहिवासी परिसरामध्ये एकतर एवढी मोठी शाळा आहे. पालकांची वाहने नीट लावलेली नसतात. कुठेही कशाही गाड्या लागतात, तरी शाळेच्या वेळेमध्ये चौकीदाराने आणि संबंधित लोकांनी याकडे लक्ष द्यावे.
- कादंबरी काळे, मोशी प्राधिकरण
PNE25V23736

दत्त मंदिर रस्त्यावर सिग्नलची गरज
वाकडच्या दत्त मंदिर रस्त्यावरील राजवाडी गौरव हॉटेल, उत्तम स्वीट्स चौकाला सिग्नलची आवश्यकता आहे. शनिवार, रविवार येथे वाहतूक कोंडी असते. वाकडमधील अनेक चौकांमध्ये वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी सिग्नल यंत्रणा बसवण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी सिग्नल नसल्यामुळे वाहतूक कोंडी होते. लोकांना वेळेवर पोहोचायला अडचणी येतात. सिग्नल नसल्यास अपघाताची शक्यता वाढते.
- अशोक मोरवाल, वाकड
PNE25V23735

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com