संतसृष्टीसह विविध प्रकल्पांचे अनावरण
पिंपरी, ता. १८ ः पुणे - आळंदी पालखी मार्गावर वडमुखवाडी येथील संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचे समूहशिल्प व संतसृष्टी, चिखलीतील संतपीठाचे प्रेक्षागृह व कलादालन लोकार्पण यासह विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (ता. १८) झाले.
वडमुखवाडीतील थोरल्या पादुका मंदिर परिसरात नवीन पिढीला मराठी संस्कृतीमधील वारकरी संप्रदायाची व संतांची माहिती समजण्यासाठी महापालिकेने संतसृष्टीची निर्मिती केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीचे स्मरणरूप ‘संतसृष्टी’ साकारली आहे. त्यात मिश्र धातूपासून तयार केलेली २५ शिल्पे आहेत. त्यामध्ये संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान महाराज, संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताबाई आणि २० वारकऱ्यांचे पुतळे समाविष्ट आहेत. या शिल्पांसोबतच चौथरा, रिटेनिंग वॉल, स्टोन क्लॅडिंग, ओपन एअर थिएटर, विद्युत आणि बागकाम, रेलिंग व स्वच्छतागृहही आहे. या परिसरात संतांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांवर आधारित ४७ ब्रॉन्झ म्युरल्स उभारले असून त्यांची माहिती देणारे फलकही लावले आहेत. त्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.
चिखलीत संतपीठ
महापालिकेने चिखलीत ‘संतपीठ’ स्थापन केले आहे. त्यामध्ये तळमजला आणि पाच इतर मजले आहेत. एकूण बांधकाम क्षेत्र १३१६१.७१ चौरस मीटर आहे. चार लिफ्ट असून दिव्यांग मुले आणि व्यक्तींसाठी रॅम्पची सुविधा आहे. इमारतीमध्ये ५५ वर्गखोल्या, नऊ कार्यालये आणि ४० इतर खोल्या आहेत. त्यामध्ये प्रयोगशाळा, संगणक कक्ष, सभागृह, संगीत तथा वाद्य कक्ष, प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृहे आहे. विद्यार्थ्यांना खेळण्याकरिता मैदान आहे. विद्युत व अग्निशमन व्यवस्था आहे.
भूमिपूजने...
- पिंपरी चिंचवड शहरात दीड लाख देशी वृक्षारोपण मोहीम प्रारंभ
- किवळे मुकाई चौक ते लोढा स्किमपर्यंत द्रुतगती मार्गालगत १२ मीटर रुंद डीपी सेवा रस्ता
- बापदेव मंदिर येथील किवळे गावातील मुख्य रस्ता ते द्रुतगती मार्गापर्यंतचा सिंबायोसिस कॉलेजमागील १८ मीटर रुंद डीपी रस्ता
- विकासनगर येथील मुख्य रस्ता डांबरीकरण
- गवळी माथा ते इंद्रायणीनगर चौकपर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट स्केपिंग पद्धतीने विकसित करणे
अनावरण, उद्घाटने...
- दिव्यांग नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण, त्यांचे सामाजिक व आर्थिक जीवनचक्राचे मॅपिंग
- संत मदर टेरेसा उड्डाणपुलावरून चिंचवड बाजूकडे उतरण्यास व चढण्यास बांधलेल्या रॅम्प
- पवना नदीवर थेरगाव प्रसूनधाम शेजारील १८ मीटर रुंद डीपी रस्त्यावरील पूल
- चिखलीतील १२ व पिंपळे निलख येथील १५ एमएलडी क्षमतेच्या मैलाशुद्धीकरण प्रकल्प
- पिंपळे सौदागर येथील क्लायबिंग वॉल
- दिघी व भोसरीतील शाळा इमारती
- चोविसावाडी अग्निशमन केंद्र इमारत
- थेरगाव व भोसरी रुग्णालयाचे मध्यवर्ती निर्जंतुकीकरण
- सखुबाई गबाजी गवळी उद्यानाजवळील बहुमजली वाहनतळ
- पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातर्फे विकसित ‘ज्येष्ठानुबंध’ या ज्येष्ठ नागरिकांसाठी ॲप व ट्रॅफिक बडी वाहतूक नियमनाकरिता व्हॉट्सॲप प्रणाली
----
भगव्या ध्वजाचे लोकार्पण
चऱ्होली : वडमुखवाडी येथील थोरल्या पादुका मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या भेटीचे ऐतिहासिक समूह शिल्प, संतसृष्टी आणि २०० फूट उंच भगव्या ध्वजाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. चोवीसावाडीतील अग्निशामन केंद्राचे उद्घाटनही त्यांनी केले. खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, महापालिका आयुक्त शेखर सिंग उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.