पाऊस, पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन ‘अलर्ट’
पिंपरी, ता. १९ : शहर परिसरासह मावळ व मुळशी तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना, इंद्रायणी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने नागरिकांच्या सुरक्षा, अडथळे दूर करण्यासाठी तयारी केली आहे. प्रामुख्याने पाणी साचण्याच्या ठिकाणी किंवा पूरस्थितीच्या घटनांवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी संपूर्ण पावसाळी आपत्कालीन योजना कार्यान्वित केली आहे.
महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील नियंत्रण कक्ष २४ तास आणि सातही दिवस कार्यरत आहे. दिवसभरात तीन टप्प्यांत कार्य करणारी समर्पित पथके नियुक्त केली आहेत. पाण्याचा संचय होण्याची शक्यता असलेले संवेदनशील भाग ओळखून तिथे जलद प्रतिसाद पथके तैनात केली आहेत. ही पथके पंप, बचाव साहित्य आणि आवश्यक मनुष्यबळासह सज्ज आहेत. अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये १५ हून अधिक बचाव बोटी आणि २०० जीवरक्षक जॅकेट्स सज्ज ठेवली आहेत. पवना आणि इंद्रायणी नद्यांलगत असलेल्या पूरग्रस्त भागांवर विशेष लक्ष ठेवले आहे.
आरोग्य संवर्धन
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने पाण्याद्वारे पसरणाऱ्या आजारांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य पथक सज्ज ठेवले आहेत. संवेदनशील भागांत पाणी निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तात्पुरत्या निवाऱ्यांची देखील नोंद घेण्यात आली आहे. पाणीपुरवठा व विद्युत विभाग भूमिगत आणि उघड्या पायाभूत सुविधांवर लक्ष ठेऊन आहेत.
संततधार पाऊस सुरू असला, तरी घाबरण्याचे कारण नाही. महापालिकेने संभाव्य स्थितीचा विचार करून योग्य ती नियोजनबद्ध तयारी केली आहे. संबंधित यंत्रणा, मनुष्यबळ आणि साधने तैनात करण्यात आली आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहून जवळच्या नियंत्रण कक्षाशी त्वरित संपर्क साधावा.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका
महत्त्वाचे नियंत्रण कक्ष क्रमांक
मुख्य पूर नियंत्रण कक्ष (मुख्यालय) : ०२०-२६७३३११११, २८३३११११
अग्निशमन व आपत्कालीन सेवा : ९९२२५०१४७५, ०२०-२७४२३३३३
अग्निशमन नियंत्रण कक्ष अधिकारी आणि सहायक व्हॉट्स ॲप क्रमांक : ७७५७९६६०४९
केंद्रीय हेल्पलाइन : ०२०-६७३३३३३३, ९९२२५०१४५१
नियंत्रण कक्ष क्रमांक:
अ क्षेत्रीय कार्यालय : ०२०-६८३३४४००, ९९२२५०१४५४
ब क्षेत्रीय कार्यालय : ०२०-६८३३४३००, ९९२२५०१४५५
क क्षेत्रीय कार्यालय : ०२०-६८३३४५००, ९९२२५०१४५७
ड क्षेत्रीय कार्यालय : ०२०-६८३३४७००, ९९२२५०१४५९
ई क्षेत्रीय कार्यालय : ०२०-६८३३५०००, ८६०५७२२७७७
फ क्षेत्रीय कार्यालय : ०२०-६८३३५३००, ८६०५४२२८८८
ग क्षेत्रीय कार्यालय : ०२०-६८३३५५००, ७८८७८७९५५५
ह क्षेत्रीय कार्यालय : ०२०-६८३३५७००, ९१३००५०६६६
पालखी सोहळ्यासाठी विशेष तयारी
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा गुरुवारी (ता.१९) पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाला. आकुर्डीत पालखीचा मुक्काम असून शुक्रवारी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा शुक्रवारी (ता. २०) सकाळी शहरात प्रवेश करणार असून, दुपारनंतर पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात वारकऱ्यांचा वावर असेल. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विविध विभागांनी कार्यवाही सुरू केली आहे. आषाढीवारी पालखी मार्गांवर कोणताही अडथळा येऊ नये, पालखी मार्गावर कुठेही पाणी साचू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. तसेच, विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. स्टॉर्म वॉटर चेंबरच्या झाकणांवर लक्ष ठेऊन कचऱ्यामुळे अडथळा निर्माण होऊ न देण्याची दक्षता घेण्यात येत आहे. यांत्रिक साधनांनी सज्ज आपत्कालीन पथके भोसरी, दिघी आणि निगडी परिसरात तैनात असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी कळविले आहे.
नागरिकांना सूचना
- पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे टाळावे
- महापालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया चॅनेल्सवर वेळोवेळी लक्ष ठेवावे
- पाणी साचणे, झाडे पडणे किंवा वीजविषयक तक्रारी असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.