वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची भक्ती

वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची भक्ती

Published on

पिंपरी, ता. २ : खांद्यावर भगवी पताका घेऊन चालणारे वारकरी, मुखातून होणारा माउली-तुकोबारायांचा अखंड जयघोष आणि त्यांची सेवा करणारे भाविक...असे भक्तिपूर्ण वातावरण शुक्रवारी (ता.२०) पिंपरी-चिंचवड शहरात अनुभवता आले. निमित्त होते, आषाढी वारीनिमित्त देहू येथून पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे. त्यात सहभागी वारकऱ्यांची सेवा करण्यात शहरातील नागरिकांनी शुक्रवार सत्कारणी लावला. कोणी पाणी वाटप करत होते. तर, कोणी केळी, बिस्किट यासह नाश्ता. काहींनी आरोग्य सेवा केली, तर काहींनी वारकऱ्यांना औषधी उपलब्ध करून दिली.

मॉडर्न हायस्कूलतर्फे अन्नधान्य वाटप
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल यमुनानगर निगडी प्रशालेने वारकऱ्यांसाठी अन्नधान्य, शिधा, राजगीरा लाडू, बिस्किट पुडे यांचे वाटप आले. या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका शारदा साबळे, पर्यवेक्षक विजय पाचारणे, शिक्षक राजीव कुटे, गंगाधर सोनवणे, खंडू खेडकर, शिवाजी अंबिके, नवेश पाटील, गंगाधर वाघमारे, अमोल नवलपुरे, विजय अहिरे यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे शाळा समिती अध्यक्ष मानसिंग साळुंखे, व्हिजिटर प्रमोद शिंदे यांनी कौतुक केले.

स्व. देवकुळे फाउंडेशनकडून औषधसेवा
पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी स्व. ज्ञानेश्वर देवकुळे सोशल फाउंडेशनतर्फे औषधे उपलब्ध करून देण्यात आली. ही औषधे स्व. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. हेमंत देवकुळे यांनी स्व. तात्या बापट स्मृती समितीकडे सुपूर्द करण्यात आली. ही समिती रुग्णवाहिका आरोग्य सेवा पुरवते. यावेळी समितीचे सदस्य आनंद पोरे व प्रकाश साकोरे यांच्याकडे औषधे सोपविण्यात आली. त्यावेळी स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष सचिव मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते.

डी. वाय. पाटील फार्मसीच्या विद्यार्थ्यांकडून औषध वाटप

आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी औषधे वाटप करून
वारकऱ्यांची आरोग्यसेवा केली. वारीच्या वाटेवर असताना वारकऱ्यांना जुलाब, उलटी, अंगदुखी, सर्दी असे त्रास होऊ शकतात. याचा विचार करत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वारकऱ्यांना किरकोळ आजारांवरील सहज उपलब्ध होणाऱ्या औषधांचे वाटप करून समुपदेशन केले. या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे ही सर्व औषधी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी धीरज सुराणा, तुषार लुंकड, प्रिया मोरे, महेश वाघ, सुरेश क्षीरसागर आणि युगल ओसवाल यांनी सामाजिक बांधिलकीतून मोफत उपलब्ध करून दिली. या उपक्रमासाठी प्रा. मुकेश मोहिते, प्रा. आशिष चिंबाळकर, प्रा. पवनकुमार वानखडे यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व सोनवणे, कृष्णा म्हसे, वेदांग जाधव, शार्दुल ढमाले, सानिका सांगवे यांनी पुढाकार घेतला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सतेज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, संकुल संचालक ॲड. अमित विक्रम यांनी फार्मसी महाविद्यालयाचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ
प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ आणि विश्व श्रीराम सेना यांच्यातर्फे आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त सेवा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, अक्रम शेख, मुजफ्फर इनामदार, विश्व श्रीराम सेनेचे लाल बाबू गुप्ता, प्रमोद गुप्ता व सामाजिक कार्यकर्त्या पूजा सराफ आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com