
पिंपरी, ता. २० : संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे निगडी येथे शिवतेज प्रतिष्ठान व श्री संत तुकाराम महाराज व्यापार संकुलाच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच, वारकऱ्यांची सेवा करण्यात आली.
यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना चिंचवड विधानसभा शहर संघटक संतोष सौंदणकर, हरेश नखाते, रवींद्र चौधरी, नंदकिशोर तोवर, विजय शिनकर, सुहास पाठक, गणेश वाडकर, दिनकर चव्हाण, प्रफुल पोटफोड, ओमप्रसाद परदेशी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. दिंडी प्रमुखांचा पुष्पहार आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व वारकरी भाविकांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र होमिओपॅथिक फीमेल डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने वारकऱ्यांना मोफत औषधे देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.