लोखंडी पूल बंद करूनही वाहतूक सुरूच

लोखंडी पूल बंद करूनही वाहतूक सुरूच

Published on

सोमाटणे, ता. २३ : सांगवडे लोखंडी पूल धोकादायक झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तेथून वाहतूक बंद केली. तरीही, काही चालक नसते धाडस करत तेथून वाहने नेत आहेत.
पवनमावळ पूर्व भागातील पादचारी व दुचाकीधारकांना शेतमाल विक्रीसाठी मामुर्डी-देहूरोडमार्गे पिंपरी-चिंचवड, पुणे येथे जलद नेता यावा, यासाठी सुमारे ३५ वर्षांपूर्वी सांगवडे येथे पवना नदीवर अरुंद लोखंडी पूल बांधण्यात आला. पण, गेल्या दहा वर्षांमध्ये यावरुन कार, जीप, टेंपो, ट्रॅक्टर यांची वाहतूक सुरू झाली. त्यामुळे हा पूल कमकुवत झाला. त्याच्या आधाराचे खांबही वाकले असून काही ठिकाणी लोखंडी जोड तुटले. ही बाब लक्षात येताच तीन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल धोकादायक असल्याचे सांगत प्रवेश मार्गावर दगडी बांधकाम केले आणि चारचाकी वाहनांची ये-जा बंद केली. ‘पूल वाहतुकीस धोकादायक’ असे फलकही लावण्यात आले. परंतु बेपर्वाईने वागणाऱ्या काही वाहनचालकांनी दगडी बांधकाम तोडून रस्ता केला व चारचाकी वाहतूक सुरू केली. ती अजूनही सुरूच आहे.

नवीन पुलाचे काम सुरू
दरम्यान, दळवळणासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व पीएमआरडीए यांनी दोन आठवड्यांपूर्वी ३०७ मीटर लांब व १२ मीटर रुंद अशा नवीन पुलाचे बांधकाम सुरू केले. ते तीस महिन्यांत पूर्णही होणार आहे. पण, काही वाहनचालक अजूनही जुन्या पुलावरून वाहने नेत आहेत.

कुंडमळा दुर्घटनेनंतरही बोध नाही
मावळात सांगवडे व कुंडमळा हे दोनच पादचारी लोखंडी पूल बांधण्यात आले होते. यातील कुंडमळा येथील पुलावरील दुर्घटना नुकतीच घडली. तरीही याचा चारचाकी वाहन चालकांनी बोध घेतला नसून सांगवडे पूलावरुन वाहतूक सुरूच ठेवली आहे.

नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आदेश पाळावेत. धोकादायक असलेल्या या पुलावरुन चारचाकी वाहन नेण्याचे धाडस करू नये.
- रोहन जगताप, सरपंच, सांगवडे

सांगवडे : धोकादायक पुलावरुन जड सुमो जीप वेगाने नेणारा वाहनचालक.

PNE25V24738

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com