स्वयंसेवी संस्थांकडून स्वच्छता मोहीम वारीमार्गावर विद्यार्थ्यांकडून ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’चा संदेश
पिंपरी, ता. २१ ः निगडी ते दापोडी या पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांबरोबरच शाळा-महाविद्यालये आणि विविध स्वयंसेवी संस्थांनी शुक्रवारी (ता. २०) पालखी मार्गावर स्वच्छता मोहीम राबवली. विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून ‘स्वच्छता हा खरा धर्म’, ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’चा संदेश दिला.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली. वारीत हजारो वारकरी मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले आहेत. उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात पालखीचे भक्तिमय वातावरणात गुरुवारी स्वागत करण्यात आले. यावेळी विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि राजकीय पक्षांनी अन्नदान आणि पाणी वाटप करून वारकऱ्यांची सेवा केली. मात्र, पालखी पुढे गेल्यानंतर निगडी भक्ती-शक्ती चौक ते आकुर्डी मार्गावर मोठ्या प्रमाणावर खाद्य पदार्थांचा कचरा, प्लॅस्टिक पाणी बाटल्या, पावसापासून बचाव करण्यासाठी वापरण्यात आलेल्या प्लॅस्टिक घोंगता यासह विविध वस्तूंचा खच पडला होता. पालखी पुढे जाताच महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी आणि ‘अर्थ’ आणि ‘पिंची’ संस्थांसह विविध स्वसंसेवी संस्थांनी स्वच्छता मोहीम राबवून काही वेळातच वारीमार्ग स्वच्छ केला. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी आकुर्डी येथून शुक्रवारी सकाळी पुण्याच्या दिशेने रवाना झाली. आकुर्डी ते दापोडी मार्गावर विविध स्वयंसेवी संघटना आणि राजकीय पक्षांमार्फत अन्नदान तसेच प्रवासात उपयोगी पडणाऱ्या साहित्याचे वाटप करून वारीचा आनंद मिळविण्याचा प्रयत्न केला. पण, या मार्गावर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले होते. सलग दुसऱ्या दिवशी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसह विविध स्वयंसेवी संघटना आणि शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी वारी मार्ग स्वच्छ केला. आकुर्डी ते दापोडी या पालखी मार्गावर एसएनबीपी महाविद्यालयातील ५० विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता.
---
‘‘वारीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन केवळ प्रशासनासाठी खूप कठीण आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ या स्तुत्य उपक्रमाला सहकार्य करण्याच्या हेतूने आम्ही ‘अर्थ’ आणि ‘पिंची’ संस्थांनी मिळून पुढाकार घेतला. ही केवळ स्वच्छतेची जबाबदारी नाही, तर ही आमची विठोबाप्रती असलेली भक्ती आणि सामाजिक जाणीवही आहे.
- प्रविणा कलमे, सीईओ, अर्थ
--
‘‘भक्तीसह आपण भोवतालच्या पर्यावरणाची जबाबदारीही घेतली पाहिजे, असा एक सामाजिक संदेशही या उपक्रमातून देण्याचा प्रयत्न केला.
- पूनम परदेशी, संस्थापक, पिंची
फोटो ः 24832
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.