वाचक लिहीतात
वाचक लिहितात
मुकाई चौक ते पुणे स्टेशन
बससेवा सुरू करावी
पीएमपीएमएलने नवीन बीआरटी मार्ग मुकाई चौक ते निगडी सुरू केला. अतिशय स्तुत्य गोष्ट आहे. मुकाई चौक परिसरातील वेगाने वाढणारी वस्ती लक्षात घेता पुणे स्टेशन, स्वारगेट, आळंदी येथे जाण्यासाठी बससेवा सुरू केल्यास निश्चित प्रतिसाद मिळेल. तसेच मुकाई चौकात बसस्टॉपला असलेल्या पायऱ्यांमुळे बसेस बीआरटी स्टॉपला समांतर उभ्या राहत नाहीत. त्यामुळेच ज्येष्ठ, स्त्रिया यांना बसमध्ये चढताना त्रास होतो. यावर तोडगा काढावा.
-श्रीनिवास धोंगडे, शिंदे वस्ती, रावेत.
रस्त्याचे काम त्वरित करावे
पुणे-नाशिक महामार्गावर सिमेंट कॉंक्रीट रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या महामार्गावर प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. विशेषतः आळेफाटा ते नाशिकपर्यंत वाहने धीम्या गतीने पुढे सरकतात. त्यामुळे पुणे-नाशिक प्रवासात वेळ आणि इंधनाचा अपव्यय होतो. यावर उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करणे आवश्यक आहे. रस्त्याची कामे करताना पर्यायी वाहतूक व्यवस्था सक्षम करून नंतरच कामे करायला पाहिजेत. पुणे-नाशिक, नाशिक-पुणे प्रवास गेल्या अनेक दिवसांपासून त्रासदायक व मनस्ताप देणारा ठरत आहे. यावर लवकरात लवकर उपाय योजना करणे आवश्यक आहे. अन्यथा लोकांचा संयम सुटला तर नक्कीच जनक्षोभ उसळू शकतो.
-सुहास होनराव, वाकड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

