निऱ्हाळी समाज मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
पिंपरी, ता. २६ ः निऱ्हाळी समाज मंडळ संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन चिंचवडमधील अक्षय सभागृहात नुकतेच उत्साहात झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी समाजाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष नारायण काळपगार होते. सोलापूर जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी दीपप्रज्वलन झाले. संस्थेचे अध्यक्ष शिरीष कळसकर व सचिव पांडुरंग कदरकर यांनी शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन आमंत्रितांचा सत्कार केला. नरेंद्र डावखरे व प्रद्युम्न कळसकर यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. उपाध्यक्ष राजेश शिरोलकर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी दादासाहेब फाळके सिने अकादमीचा पुरस्कार मिळवणाऱ्या आकाश डावखरे यांना गौरविण्यात आले. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गणेश निऱ्हाळी उपक्रमाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणाऱ्या विविध संस्थांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
अध्यक्षांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. समाजातील ज्येष्ठ महिला इंदूबाई नाकील यांचाही विशेष सत्कार संस्थेच्या सभासद प्रेमा लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुणा कळसकर यांनी केले. उत्तरार्धात मनोरंजनाचे कार्यक्रम आणि खेळ आयोजित करण्यात आले. नरेंद्र डावखरे, राजेश शिरोलकर यांनी नियोजन केले.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

