शहराचा विकास नियोजनबध्द व वेगाने करणार : आमदार महेश लांडगे

शहराचा विकास नियोजनबध्द व वेगाने करणार : आमदार महेश लांडगे

Published on

शहराचा नियोजनबध्द व वेगाने विकास करणार
: आमदार महेश लांडगे

इंट्रो : पिंपरी चिंचवड शहरात मागील पाच वर्षांत भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळात आम्ही विविध विकास प्रकल्प राबविले. त्याचबरोबर शहरात पायाभूत सुविधा देण्यावरही भर दिला. भविष्यात शहरातील सर्व पदाधिकारी आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे यांच्या पाठींब्याने व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवडकरांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पायाभूत सुविधा विकसीत करत शहराचा नियोजनबध्द व वेगाने विकास करणार आहोत.

- महेश लांडगे, आमदार, भाजप-भोसरी
औ द्योगिकनगरी, कामगारनगरी, बेस्ट सिटी, स्मार्ट सिटी... यासह आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत नगरपालिका, अशी अनेक बिरुदावरली मिरवणारे पिंपरी चिंचवड. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आणि भोसरी अशा चार ग्रामपंचायतील मिळून दि. ४ मार्च १९७० रोजी पिंपरी चिंचवड नवनगरची निर्मिती करण्यात आली.
स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून पिंपरी चिंचवड परिसरात औद्योगिक वसाहत विकसित झाली. पिंपरी चिंचवड या औद्योगिकनगरीचे शिल्पकार म्हणून स्व. अण्णासाहेब मगर यांना ओळखले जाते. शहराचा चौफेर विस्तार आणि लोकसंख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे दि. ११ ऑक्टोबर १९८२ रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थापना झाली. या शहराच्या विकासाच्या वाटचालीत स्व. अण्णासाहेब मगर, स्व. प्रा. रामकृष्ण मोरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे योगदान मोठे आहे.
शहराचे पहिले महापौर, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्यापासून आतापर्यंत किमान २९ महापौरांनी शहराचे नेतृत्व केले. ज्ञानेश्वर लांडगे, विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, गौतम चाबुकस्वार, अश्‍विनी जगताप अशा दिग्गजांनी विधानसभेत शहराचा आवाज बुलंद केला. मात्र, या शहरातील नेतृत्वाला राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही, ही सल कायम आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे आता शहराची सत्तासूत्रे एकवटली आहेत. पिंपरी चिंचवड महापलिकेत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप याच्यानंतर आमदार महेश लांडगे व आमदार शंकर जगताप यांचे वर्चस्व आहे.

शास्तीकर पुर्ण माफ केला

भारतीय जनता पार्टीची महापालिकेत २०१७ मध्ये माझ्या व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आल्यानंतर आम्ही शहरातील अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, रेडझोन हे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. शास्तीकर १००० चौरस फुटापर्यंत माफ करण्यात यश मिळाले आहे. आता राज्यात पुन्हा भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची म्हणजेच महायुतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यामुळे शास्तीकर पुर्णपणे माफ करण्यात यश आले आहे.

पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राबविणार

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प केंद्र व राज्य शासन, पीएमआरडीए व महापालिका यांच्यातीने राबवणार आहोत. त्याचबरोबर शहरातील पवना नदी सुधार प्रकल्प हाती घेण्यात आला असून लवकरच तो तडीस नेणार आहोत.

शहरात केलेली विकास कामे -

समाविष्ट गावांचा झपाट्याने विकास केला

शहरात १९९७ मध्ये समाविष्ट १७ गावांमध्ये विकास झालेला नव्हता. आम्ही सर्व प्रथम या भागावर लक्ष केंद्रीत केले व महापालिकेच्या माध्यमातून या भागात पहिल्या दोन-तीन वर्षातच तीन ते साडोतीन हजार कोटी रुपयांची कामे केली. त्यामुळेच मोशी, चऱ्होली ते चिखली पर्यंत झपाट्याने विकास झालेला दिसत आहे. स्मशाभुमीपासून ते आरोग्य सुविधांपर्यंत या भागात विकास कामे केली आहेत. शहरात अंतरराष्ट्रीय दर्जाचे कुसती संकुल व कबड्डी संकुल उभे करत आहोत. शहराला ‘स्पोर्ट सिटी’ अशी ओळख मिळावी, या दृष्टीने आम्ही काम करत आहोत.

आरोग्य सुविधा दारात दिली

उच्च शिक्षणाच्या संधी मिळाव्यात म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. आरोग्याची सुविधा त्या-त्या भागातील रुग्णांना मिळावी म्हणून चिखली व मोशी येथे आरोग्य वर्धिनी केंद्र सुरु केले त्याच धर्तीवर शहरात विविध भागात ४१ आरोग्य वर्धिनी केंद्र सुरु केले आहेत.

मेट्रोचे जाळे पूर्ण पिंपरी चिंचवड व पुणे शहरापर्यंत विकसीत करणार

शहरात भक्ति-शक्ती समूह शिल्पाजवळ प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. त्या ठिकाणी ग्रेड सेपरेटर विकसीत करुन येथील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविला. त्याच बरोबर शहरात मेट्रोची सुविधा पहिल्या टप्प्यात फुगेवाडी ते पिंपरी पर्यंत सुरु केली असून पिंपरी ते निगडी पर्यंतचे विस्ताराचे काम सुरु आहे. लवकरच ती सुविधा निगडी ते पुणे शहरात शिवाजीनगर, स्वारगेट व कात्रज पर्यंत नेणार आहोत. त्याचबरोबर चाकण ते हिंजवडी मेट्रो मार्गाचाही प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे.

भविष्यात करण्यात येणारी विकास कामे

महाराष्ट्रातील सर्वात मोठी इंद्रायणी थडी, भारतातील सर्वांत मोठी ‘रिव्हर सायक्लोथॉन’, सर्वांत मोठी बैलगाडा शर्यत यासह विविध ‘बिग बजेट’ उपक्रम राबवले असून याद्वारे संपूर्ण राज्यभरातच नव्हे तर जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळत आहे. जगातील सर्वांत उंच छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा अर्थात ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ अंतिम टप्प्यात आहे. हा पुतळा शहराचे भूषण ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र, आंतरराष्ट्रीय कबड्डी संकूल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ, शासकीय महाविद्यालय, पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठी ८५० बेडचे प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी चिंचवड न्यायालयाची प्रस्तावित प्रशस्त इमारत असे लक्षवेधी प्रकल्प भाजपने हाती घेतले आहेत. त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे शहरातील सर्व पदाधिकारी आमदार शंकर जगताप यांच्या पाठींब्याने व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवडकरांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पायाभूत सुविधा विकसीत करत शहराचा नियोजनबध्द व वेगाने विकास करणार आहोत.
(शब्दांकन : जयंत जाधव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com