सकाळ संवाद

सकाळ संवाद

Published on

बीआरटी स्थानकांची दुरवस्था
मुकाई चौक ते औध या बीआरटी मार्गवरील स्थानके भिकारी, मद्यपी यांचे अड्डे झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत आणि नाक दाबून स्थानकातून ये-जा करावी लागते. रावेत येथील पंपिंग स्टेशन परिसरातील स्थानकाची अशीच दुरवस्था झाली आहे. याची देखभाल जबाबदार कोणाची आहे? नुकताच मुकाई चौक ते भक्ती-शक्ती हा नवा मार्ग सुरू झाला आहे, त्याचीही अवस्था अशीच होणार का? संबंधितांनी या परिस्थितीचा आढावा घ्यावा.
- श्रीनिवास धोंगडे, शिंदे वस्ती, रावेत
PNE25V71399


पडवळ आळीत पदपथच आवश्यक
चिंचवड येथील पडवळ आळीत पदपथच नाहीत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी असतात. यामुळे नागरिकांची गैरसोय होते. या समस्येची दखल घेऊन पालिका प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- रमेश पाटील, चिंचवड
PNE25V71397

दिशादर्शक फलक गायब
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे येथे सीआरपीएफ च्या समोर लोणावळा, उर्से टोलनाका व वडगाव मुंबईकडे जाणारा रस्ता तसेच किलोमीटर दर्शविणारा एक फलक येथील लोखंडी कमानीवर होता. मागील दोन वर्षांपासून हा फलक येथून गायब झाला आहे. कोल्हापूर, पुणे, कर्नाटक आणि बाहेरील राज्यातील तसेच नवीन वाहनचालक या ठिकाणी आल्यावर संभ्रमात पडतात. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या जागेवरील फलक त्वरित बसवावा.
- दिलीप डोळस, तळेगाव दाभाडे
PNE25V71428

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com