‘सकाळ’ वाचक, हितचिंतकांचा उद्या चिंचवडमध्ये स्नेहमेळावा

‘सकाळ’ वाचक, हितचिंतकांचा उद्या चिंचवडमध्ये स्नेहमेळावा

Published on

पिंपरी, ता. २७ : लाखो वाचकांची ‘सकाळ’ ज्याच्या वाचनामुळे खऱ्या अर्थाने उल्हासित होते, तो म्हणजे आपला सर्वांचा ‘सकाळ’. याच आपल्या ‘सकाळ’चे पिंपरी चिंचवड कार्यालय ३३ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. यानिमित्त आपल्याशी संवाद साधायला, हा विश्वास आणि स्नेह अधिक वृद्धिंगत करण्यासाठी भेटूयात शनिवारी (ता. २९) सायंकाळी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण प्रेक्षागृहाच्या प्रांगणात.

‘सकाळ’च्या वर्धापन दिनानिमित्त वाचक, जाहिरातदार, विक्रेते आणि हितचिंतकांचा स्नेहमेळावा शनिवारी (ता.२९) सायंकाळी ५.३० वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह प्रांगणात साजरा होणार आहे. त्यावेळी वाचकांच्या मांदियाळीत सहभागी होण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, आपण सुद्धा नक्की यावे हे आग्रहाचे निमंत्रण ‘सकाळ’ परिवार देत आहे. कारण, ‘सकाळ’सोबतचे आपले विश्वासाचे नातं आणि तीन दशकांचा आपला स्नेह अधिक वृद्धिंगत करायचा आहे. त्यासाठी नक्की भेटू या! पण, पुष्पगुच्छ आणू नये, ही आग्रहाची नम्र विनंती.

काय? कुठे? कधी? केव्हा?
काय? : सकाळ, पिंपरी कार्यालय ३३ वा वर्धापन दिन
कुठे? : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह प्रांगण, चिंचवड
कधी? : शनिवार, ता. २९ नोव्हेंबर २०२५
केव्हा? : सायंकाळी ५.३० ते ८.३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com