सकाळ संवाद
पदपथ, रस्त्यावरील राडारोडा हटवावा
वाकड येथील दत्त मंदिर रस्त्यावर व श्रीराम मंदिर समोरील ओमेगा पॅराडाईज लगतच्या पदपथ व रस्त्यावर कचरा, टाकाऊ साहित्य, झाडांच्या फांद्या, पालापाचोळा, अनेक दिवसांपासून पडून आहेत. आरोग्य विघातक गोष्टींमुळे रोगराई वाढत आहेत. वारंवार संबंधितांना कळवून देखील स्वच्छता होत नाही. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. तरी महानगरपालिकेने येथील राडारोडा हटवून स्वच्छता करावी.
- दिलीप बाफना, वाकड
PNE25V71567
टाकाऊतुन टिकाऊमुळे शहर सुंदर
महापालिकेने टाकाऊ मधून टिकाऊ वस्तुरूपात बनवलेल्या आकर्षक वस्तूंमुळे शहराच्या सौंदर्यात वाढ होत आहे. त्याबद्दल महापालिकेचे आभार.
- चंद्रकांत ढवळे, पुनावळे
PNE25V71566
सांडपाणी वाहिनीची दुरुस्ती करावी
भोसरी मधील इंद्रायणीनगर येथील सेक्टर दोन मिनी मार्केट मंडई शेजारील सांडपाणी वाहिनी तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन सांडपाणी वाहिनीची दुरुस्ती करावी.
- सागर सुपल, इंद्रायणीनगर, भोसरी
PNE25V71565
धोकादायक बांधकाम क्रेन हटवावी
विशालनगर येथील पिंपळे निलख परिसरातील चौकात एक बांधकाम क्रेन उभी आहे. या चौकातून हिंजवडीची बरीच वाहतूक जाते आणि मुंबई महामार्गावर जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो. हा परिसर वर्दळीचा आहे येथे बांधकाम क्रेन वाहतूक दिव्यांच्या वरच लटकलेली आहे. क्रेनवर लटकलेल्या प्लेट्स खाली पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित बिल्डरला या ठिकाणाहून ही क्रेन हटविण्यास सांगावी.
- नितीन पाटील, पिंपळे निलख
PNE25V71568
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

