पोलिसांच्या पथकावर सराईताचा गोळीबार

पोलिसांच्या पथकावर सराईताचा गोळीबार

Published on

पिंपरी, ता. २७ : सराईतांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर मोटारीतील गुन्हेगाराने गोळीबार केला. हवालदाराने प्रसंगावधान राखत ते पिस्तूल हिसकावले. या झटापटीवेळी सुटलेली गोळी मोटारीच्या छतातून आरपार गेली. हा प्रकार गुरुवारी (ता. २७) पहाटे साडेपाचच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे टोल नाका येथे घडला.
सनीसिंग पापासिंग दुधानी (वय २४), जलसिंग राजपुतसिंग दुधानी (वय ३२, दोघेही रा. रामटेकडी, हडपसर) आणि मनीष बाबुलाल कुशवाह (वय २८, रा. मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, सात जिवंत काडतुसे, दागिने, हत्यारे असा आठ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रावेत येथील चोरीप्रकरणातील संशयित हे चोरीच्या मोटारीने सोमाटणे टोल नाक्यावर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पथकाने टोलनाक्याजवळ सापळा रचला. राखाडी रंगाची ही संशयित मोटार दिसताच पोलिसांनी तिला घेरले. यावेळी मागे बसलेल्या मनीषने पोलिसांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हवालदार भाऊसाहेब राठोड यांनी मनीषकडून ते पिस्तूल हिसकावले. या झटापटीत पिस्तूलातून सुटलेली गोळी मोटारीच्या छतातून आरपार गेली. दरम्यान, पथकातील इतर पोलिसांनी प्रसंगावधान राखत आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपींवर अन्य गंभीर गुन्हे
आरोपी सनीसिंग याच्यावर विविध पोलिस ठाण्यात दरोडा, चोरी, वाहनचोरी असे ७० गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर, जलसिंग याच्यावर ५० गंभीर गुन्हे दाखल आहेत. सनीसिंग याच्यावर पुणे शहर पोलिसांकडून मकोकाअंतर्गत कारवाई झाली असून त्यात तो जामिनावर आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिली. यावेळी सहायक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com