दिग्गज गायकांच्या स्वरांतून लोकशाहीचा गौरव
पिंपरी, ता. २८ ः ‘जागर संविधानाचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गायक चंद्रकांत शिंदे यांनी सादर केलेले भारतीय संविधानाचे गौरवगान, रसिकांची मिळालेली उत्स्फूर्त दाद.. अशा वातावरणात संविधानाचा दीप उजळला. भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ आयोजित प्रबोधन कार्यक्रमाच्या समारोपाच्या सत्रात ‘जागर संविधानाचा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये गायक चंद्रकांत शिंदे यांच्यासह गायक अजय क्षीरसागर, रेश्मा सोनवणे, राधा खुडे आणि विजय कावळे यांनी भारतीय संविधान व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गौरव गीते गायली. दिवंगत गायक प्रल्हाद शिंदे यांच्या आठवणी यानिमित्त जागवल्या गेल्या.
‘संविधान आहे..’,‘किती शोभतोय भीमराव आपला...’ ‘या संविधानावर..’, ‘तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं...’ अशी सरस गाणी या कार्यक्रमामध्ये सादर करण्यात आली. या सादरीकरणाला उपस्थित नागरिकांनी उभे राहून टाळ्यांचा प्रतिसाद दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संविधान लिहिले म्हणून आज सर्व धर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहात आहेत, असे सांगत गायक चंद्रकांत शिंदे यांनी त्यांचे वडील गायक प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील भजन ‘विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत’, तर कव्वाली ‘उड जायेगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली’ सादर करून रसिकांच्या मनाला साद घालत सर्वधर्मसमभावाचा विचार मांडला. त्यापूर्वीच्या सत्रात गायक अशोक गायकवाड, स्वप्नील पवार यांच्या गझलांची मैफील रंगली. त्यानंतर गायक संतोष जोंधळे यांचा प्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम सादर झाला. गायकांच्या सुराला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात साथ दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

