शिक्षण विभागाकडून एकल माता सर्वेक्षण
पिंपरी, ता. १ : एकल मातांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती बिकट आहे. यातील बहुतांश महिला मजुरीवर उदरनिर्वाह करतात. मुला-मुलींचे शिक्षण पूर्ण करताना त्यांना कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. यासाठी शिक्षण विभागाकडून एकल मातांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. संकलित होणाऱ्या माहितीतून एकल मातांच्या पाल्यांचे शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी घेण्याच्या दृष्टीने राज्य शासन प्रयत्न करत असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
अनेकदा एकल मातांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या मुला-मुलींना शाळेतून काढून टाकतात. अशा मातांच्या पाल्यांची संख्या संकलित करून या पाल्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी एकल मातांच्या इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या मुला-मुलींची संख्या संकलित केली जाणार आहेत. यासाठी इयत्ता पहिली ते बारावीमध्ये शिकणाऱ्या एकल मातांच्या मुलांची माहिती गुगल फॉर्मद्वारे संकलित करण्यात येत आहे. यासंदर्भात राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, शिक्षण प्रमुख यांना ही माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत.
- पाल्यांसाठी हे करणे शक्य
वसतिगृहात सोय करणे
व्यावसायिक, कौशल्य शिक्षणाचे मार्ग खुले करणे
सरकारी योजनांची माहिती पोचविणे
पाल्याचे शैक्षणिक ‘ट्रॅकिंग’ करणे
दहावी-बारावीचे शुल्क माफ करणे शक्य
शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे
- एकल मातांच्या पाल्यांना भेडसावणाऱ्या समस्या
बारावीनंतर शिक्षण घेणे अशक्य
बालविवाहाचे वाढते प्रमाण
माता जे काम करते, तेच काम विशेषतः मुली करतात
मुलाच्या शिक्षणाला मिळते प्राधान्य
एकापेक्षा जास्त पाल्य असल्यास मोठ्या पाल्याला शिक्षण होते अशक्य
कामाची शाश्वती नसल्याने पाल्य होतात शालाबाह्य
पतीचे निधन झाल्यावर दोन्ही मुलांची जबाबदारी माझ्यावर आली. पिंपरी चिंचवडसारख्या शहरात मुलांना शिकवणे अवघड होते. पण, शासनाने एकल मातांच्या मुलांना मोफत शिकविण्यासाठी योजना केली पाहिजे.
- विद्या कदम, एकल महिला, थेरगाव
एकल महिला सर्वेक्षणबाबत शिक्षण विभागाने नवीन पत्र काढले आहे. त्यानुसार प्रत्येक शिक्षणाधिकारी तयार केलेल्या गुगल शीटमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक माहिती भरणार आहेत.
- महेंद्र गणपुले, माजी अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

