संगीत प्रवचनातून उलगडणार लोकशाहीचे अनोखे नाते

संगीत प्रवचनातून उलगडणार लोकशाहीचे अनोखे नाते

Published on

पिंपरी, ता. २९ ः संविधान दिनानिमित्त चिंचवडमधील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने ‘संत, स्वराज्य आणि संविधान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संगीत प्रवचनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य, संत परंपरा आणि भारतीय संविधानातील साम्य, तत्त्वज्ञान व मूल्यांचा संगम रसिकांसमोर मांडला जाणार आहे. चिंचवड येथील चैतन्य सभागृह येथे रविवारी (ता.३०) हा कार्यक्रम होणार आहे. संविधानाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, छावा मराठा युवा महासंघ, बारा बलुतेदार महासंघ, संविधान सन्मान मंच, संविधान जागर अभियान आणि इतर पुरोगामी संस्थांनी पुढाकार घेतला आहे.
कार्यक्रमात संतांच्या शिकवणीने घडवलेला सामाजिक विचार, शिवछत्रपतींच्या लोकाभिमुख राज्य कारभारातील लोकशाहीचे बीज आणि स्वातंत्र्यानंतर संविधानातून घडलेली आधुनिक लोकशाही व्यवस्था यामधील नाते संगीत आणि प्रवचनाच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे. नागरिकांनी उपस्थित राहून संविधान, स्वराज्य आणि संत परंपरेची मूल्ये जाणून घेण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com