अस्वच्छता करणाऱ्यांकडून २८ लाखांचा दंड वसूल

अस्वच्छता करणाऱ्यांकडून
२८ लाखांचा दंड वसूल
Published on

पिंपरी, ता. २९ ः नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय रुजावी, स्वच्छताविषयक नियमांचे पालन व्हावे या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. त्याअंतर्गत सार्वजनिक स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. त्यातून नोव्हेंबर महिन्यात २८ लाख १२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार, शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी जनजागृतीबरोबरच दंडात्मक कारवाईही आरोग्य विभागाने सुरू केली आहे. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, राजाराम सलगर, अजिंक्य येळे, अश्विनी गायकवाड, तानाजी नरळे, किशोर ननावरे, अतुल पाटील, पूजा दूधनाळे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई सुरू आहे. त्यात सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे, सुधीर वाघमारे, तानाजी दाते, शांताराम माने, राजेश भाट, किशोर दरवडे, महेश आढाव, अंकुश झिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, सहाय्यक आरोग्य निरीक्षक यांनी सक्रिय सहभाग घेतला.

कारवाई करण्याची कारणे
- उघड्यावर कचरा टाकणे
- ओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण न करणे
- बंदी असलेले प्लॅस्टिक वापर
- दुकानदारांकडे दोन डस्टबिन नसणे
- सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणे

‘‘पिंपरी चिंचवड शहराची स्वच्छता ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी स्वच्छताविषयक नियमांचे पालन करून महापालिकेस सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरू राहील.
- डॉ. प्रदीप ठेंगल, उपआयुक्त, आरोग्य विभाग, महापालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com