रेणुका, सुदीप, संतोष यांना एकेरीचे विजेतेपद
पिंपरी, ता.३० ः औद्योगिक क्रीडा संघटनेतर्फे कोथरुड येथे आयोजित ६२ व्या औद्योगिक टेबल टेनिस स्पर्धेत एकेरी गटात इन्फोसिसच्या रेणुका कोल्हे, लुपिनचे सुदीप अभ्यंकर यांनी तर प्रौढ (४९ वर्षांपुढील) एकेरीत ओएफडीआरचे संतोष मेदिकुंट यांनी विजेतेपद पटकाविले. तसेच पुरुष दुहेरी गटात टाटा मोटर्सच्या मनीष मुंज, अनुपम नलावडे यांनी अजिंक्यपद प्राप्त केले.
स्पर्धेचे उद्घाटन प्राज इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष वैभव तिवारी यांच्या हस्ते झाले. तर स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रसिद्ध मोटर सायकलस्वार व पर्यटक गणेश इनामदार, प्राज इंडस्ट्रीज क्रीडा समितीचे राहुल कापसे यांच्या हस्ते झाले. यावेळी औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम, सचिव वसंत ठोंबरे, सहखजिनदार विजय हिंगे, स्पर्धा प्रमुख हरी देशपांडे, एसकेएफ क्रीडा समितीचे संतोष शिंदे, मंदार कुलकर्णी, अमित कदम आदी उपस्थित होते. खजिनदार प्रदीप वाघ यांनी प्रास्ताविक केले.
तब्बल १९ कंपन्यांचा सहभाग
स्पर्धेत टाटा मोटर्स, एसकेएफ, बजाज ऑटो (आकुर्डी), मिंडा कॉर्पोरेशन, टेट्रापॅक, सँडविक एशिया, ॲटलास कॉपको, फ्लिटगार्ड फिल्टर्स, फॉरविया फोरएशिया, प्राज इंडस्ट्रीज, लुपिन, डीआरडीओ,ॲम्युनेशन फॅक्टरी, ५१२ आर्मी बेस वर्कशॉप, इन्फोसिस, टीकेआयएल वगैरे १९ कंपन्यांच्या ८६ पुरुष व महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेसाठी राहुल कापसे, अविनाश जोशी, वासुदेव अग्निहोत्री व शिवानी निषाद यांचे मोलाचे साह्य लाभले.
स्पर्धेचे निकाल
पुरुष एकेरी ः अंतिम फेरी सुदीप अभ्यंकर (लुपिन) वि.वि. चिन्मय दंडवते (ॲटलास कॉपको) ११-४, ११-४, ११-४. उपांत्य फेरी ः अमित पाटील (बजाज ऑटो, आकुर्डी) पराभूत विरुद्ध चिन्मय दंडवते (ॲटलास कॉपको) १०-१२,१५-१७, १२-१०, ११-५, ७-११, प्रवीण सोनावणे (टेट्रापॅक) पराभूत विरुद्ध सुदीप अभ्यंकर (लुपिन) ६-११, १२-१०, ९-११, ११-४, ५-११.
पुरुष दुहेरी ः अंतिम फेरी - मनीष मुंज, अनुपम नलावडे (टाटा मोटर्स) वि.वि. अमोल पाटील व उदय शिंदे (टाटा मोटर्स) ९-११, ११-४, ६-११, ११-४, ५-११. उपांत्य फेरी - मनीष मुंज, अनुपम नलावडे (टाटा मोटर्स) वि.वि. आर्यभ्रता राय, प्रशांत कुमावत (टाटा मोटर्स) ११-९,१३-११,१४-१२, अमित पाटील व आदित्य भारद्वाज (बजाज ऑटो, आकुर्डी) पराभूत विरुद्ध अमोल पाटील व उदय शिंदे (टाटा मोटर्स) ९-११, ११-४, ६-११, ११-४, ५-११.
महिला ः अंतिम फेरी - रेणुका कोल्हे(इन्फोसिस) वि.वि. कल्पिता कुलकर्णी (एचईएमआरएल) ११-१, ११-३, ११-७. उपांत्य फेरी - कल्पिता कुलकर्णी (एचईएमआरएल) वि.वि. मीता पडनाद (प्राज इंडस्ट्रीज) ११-२, ११-३, ११-२,
रेणुका कोल्हे (इन्फोसिस)वि.वि. तनिष्का मिश्रा (बजाज ऑटो) ११-२, ११-८, १०-१२, ११-३.
पुरुष एकेरी (४९ वर्षांवरील) ः संतोष मेदीकुंट (ओएफडीआर) वि.वि. सचिन सिनकर (पॉलिब्लो) ११-५,११-३,११-७.
उपांत्य फेरी - मनिष मुंज (टाटा मोटर्स) पराभूत विरुद्ध सचिन सिनकर (पॉलिब्लो) १४-१६, ७-११,१३-१५,
संतोष मेदीकुंट (ओएफडीआर) वि.वि. सचिन निकम (टीकेआयएल) ११-९,११-८,११-२.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

