किमान तापमानात तीन अंशांनी घट
पिंपरी, ता. १ ः गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा घसरल्याने शहरातील गारवा चांगलाच वाढला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये किमान तापमानात तीन अंशांनी घट झाली आहे. कमाल तापमानही ३० अंश सेल्सिअसच्या खाली आल्याने दिवसा जाणवणारा उन्हाचा चटका कमी झाला आहे. सोमवारी (ता. १) चिंचवडचे किमान तापमान १५.३ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात तापमानात वाढ झाल्याने थंडीचा कडाका कमी झाला होता. हवामानात बदल झाल्याने एक डिसेंबरपासून थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी शहरातील तापमान १५ अंश सेल्सिअसच्या घरात आले आहे. तळेगाव दाभाडे येथे किमान तापमान ९.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

