

पिंपरी, ता. १ ः पीएमपी बसमध्ये ह्रदयविकाराचा झटका आलेल्या प्रवाशाचे प्राण वाहकाचे प्रसंगावधान आणि सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) उपचारांमुळे वाचले. भेकराईनगर ते आळंदी (मार्ग क्र. २०१) या बसमध्ये रविवारी (ता. ३०) हा प्रकार घडला. भेकराईनगर ते आळंदी (मार्ग क्र. २०१) या बसमध्ये हा प्रकार घडला.
हडपसरच्या भेकराईनगर आगारातून सकाळी दहाच्या सुमारास ही बस सुटली. रविवारी सुटी असल्याने गर्दी होती. सकाळी पावणे अकराच्या सुमारास बस अलंकार चौकात पोहचली. त्यावेळी अचानक मोठा आवाज झाला. एक प्रवासी खाली कोसळून त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. त्यामुळे गोंधळ उडाला. अशावेळी वाहक सुनील गायकवाड यांनी समयसूचकता दाखवत तत्काळ सीपीआर उपचार दिले. याशिवाय बस जवळच्या रुग्णालयात नेण्याची सूचना त्यांनी चालक श्रावण चव्हाण यांना दिली. त्यानंतर बस सुमारे १४ मिनिटांतच रूबी हॉल क्लिनिकच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचली. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी चालक आणि वाहकांच्या मदतीने प्रवाशाला आपत्कालीन विभागात दाखल केले. डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरु केले. काही वेळातच प्रवाशाने डोळे उघडल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.
या प्रवाशाचे नाव जगदीश महीरमणी असे असून ते ६४ वर्षांचे होते. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा ४० रुपयांचा पास घेतला. बसमध्ये गर्दी असल्याने ते उभ्याने प्रवास करत होते. ते खाली कोसळताच वाहक गायकवाड यांनी त्यांचे हात-पाय चोळून सीपीआर दिला. १५ मिनिटांत उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. चालक आणि वाहक अशरक्षः देवदुतासारखे धावून आल्याची भावना प्रवाशाच्या नातेवाइकांनी व्यक्त केली.
महीरमणी शुद्धीवर येईपर्यंत वाहक गायकवाड थांबून होते. त्यांना उपचार मिळण्यास दहा मिनिटे उशीर झाला असता तरी त्यांच्या जिवाचे बरेवाईट झाले असते, असे डॉक्टरांनी सांगितले.
-----------
घटनाक्रम
भेकराईनगर आगारातून बस सुटली - सकाळी १०.०५ वाजता
अलंकार चौकात दाखल - १०.४४
प्रवाशाला ह्रदयविकाराचा झटका - १०. ४६ सुमारास
बस रुग्णालयापाशी दाखल - ११ वाजता
रुग्णालय ते चौक अंतर - २०० मीटर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.