दुर्घटनाग्रस्त बसचा रस्ता कर थकीत
पिंपरी ः हिंजवडीतील अपघातग्रस्त बसची रस्ता कर (रोड टॅक्स) मुदत रविवारी (ता. ३० नोव्हेंबर) संपल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे रस्ता कर संपूनही वाहने रस्त्यावर धावत असल्याचे उघड झाले आहे. अशावेळी वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभाग करतो काय? हाच प्रश्न उपस्थित होते.
अपघातग्रस्त बसचे मालक दत्तात्रय रामचंद्र भेगडे आहेत. खासगी बसच्या एकूण प्रवासी क्षमतेवर रस्ता कर आकारला जातो. कमीत कमी तीन महिन्यांचा तर जास्तीत जास्त एक वर्षांचा कर भरता येतो. नॉन एसी बसला प्रतिसीट प्रतिवर्ष पाच हजार ५०० रुपये रस्ता कर आकारला जातो. एसी बसला प्रतिसीट प्रतिवर्ष सात हजार रुपये आकारला जातो. सोमवारच्या अपघातात बसची क्षमता ५० सीट होती. यावरून बसचा सुमारे दोन लाख ७५ हजार रुपये रस्ताकर थकीत असेल. सोमवारी रात्रीपर्यंत कराची रक्कम भरण्यात आली नव्हती.
बसची तांत्रिक माहिती
- आरटीओ नोंदणी ः १५ एप्रिल २०२४
- फिटनेस वैधता ः १४ एप्रिल २०२६
- विमा (इन्शुरन्स) वैधता ः २२ मार्च २०२६
- पीयुसीची वैधता ः २ मे २०२६
- वाहन परवाना ः ३० एप्रिल २०२९
- रस्ता कर (रोड टॅक्स) ः ३० नोव्हेंबर २०२५
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

