गुन्हे वृत्त
पित्याची जबाबदारी नाकारणाऱ्या मुलावर गुन्हा
पिंपरी, ता. २ : वडिलांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी टाळली. तसेच त्यांच्या मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा घेतला. या प्रकरणी पित्याने पोलिसांत धाव घेतली. या मुलाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दिघीतील काटे वस्ती येथे घडली.
राजेंद्र काची (वय ५७, रा. जुनी काटे वस्ती) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी गणपत काची (वय ८२, रा. जुने काटे वस्ती) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सन २०२० पासून आरोपी मुलगा फिर्यादीच्या दोन गुंठे जागेवरील घरात राहत आहे. तो मुलगा खर्च करत नसल्याने वडिलांना दुसऱ्यांकडून अन्न मागण्याची वेळ आणली. तसेच, त्याने वडिलांचे पुण्यातील दुकानकरून घेतले. दरम्यान, या मुलाने वडिलांना दरमहा पाच हजार रुपये देण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी हवेली तथा ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाने दिला होता. तरीही मुलाने ही मदत दिली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.
बेटिंगद्वारे पावणेतीन लाखांची फसवणूक
पिंपरी : बेटिंग वेब पोर्टलद्वारे विनापरवाना ऑनलाइन जुगार खेळवून फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. हा प्रकार पुनावळे येथे घडला. राजेंद्र गाडरी (वय २०), तेजेश्वर राव (वय २५), चंदनकुमार पांडे (वय ३०, सर्व रा. गायकवाडनगर, पुनावळे) अशी आरोपींची नावे आहेत. हे आरोपी बंदी असलेला बेटिंग प्रकार खेळवत होते. संगणक प्रणाली, बनावट बँक खाते, सिमकार्ड, अशा विविध कार्डाद्वारे नागरिकांची २ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

