डेटा ते निर्णय ः एसडीपी यशस्वी
- नेहा वडगावे (आयआयसीएमआर)
आयआयसीएमआरमध्ये ‘डेटाचे रूपांतर निर्णयांमध्ये ः क्षेत्रानुसार व्यवसाय विश्लेषण’ विषयावर विद्यार्थी विकास कार्यक्रम झाला. या अंतर्गत एमबीएच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांवरील सेक्टर-वाईज विश्लेषणात्मक सादरीकरणे केली. व्यवसायातील निर्णय प्रक्रियेसाठी डेटा-आधारित अंतर्दृष्टी उपयुक्त ठरण्याबाबत प्रभावीपणे मांडले. यात ‘हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम सेक्टर’ संघाने विजेतेपद पटकावले. त्यांनी ‘टुरिझम ऍनालिटिक्स फॉर पोस्ट पेंडेमिक रिकवरी’ अर्थात पर्यटन क्षेत्रातील महामारीनंतरचे पुनरुज्जीवन मांडले. शीतल माने यांनी मार्गदर्शन केले. फ्युजनिक्स गट उपविजेता ठरला. त्यांना प्रा. पूजा गवांदे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. अभय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना विश्लेषणात्मक दृष्टिकोन, उद्योगाभिमुख विचारसरणी आणि व्यवस्थापकीय निर्णयक्षमतेचे महत्त्व समजावून सांगत प्रेरणा दिली.
(74391)
कचरा व्यवस्थापन कार्यशाळा
- प्रा. रेखा भालेराव (मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, मोशी)
मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी मोशी येथे महाविद्यालयातील नॅशनल पोल्यूशन कंट्रोल असोसिएशन व स्वर्णलता मदरसन ट्रस्ट यांच्या सीएमआर निधीतून ‘सॉर्ट’ (सॅग्रीगेशन ऑफ वेस्ट फॉर रिसायकलिंग ॲंड ट्रिटमेंट) विषयावर कचरा व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित केली होती. महापालिका ‘क’ प्रभाग स्वच्छता निरीक्षक अधिकारी वैभव घोळवे, राहुल रागपसरे, सतीश हिंगवार, प्राचार्य डॉ. शशिकांत ढोले उपस्थित होते. ‘कचरा व्यवस्थापन’ विषयावर पथनाट्य झाले. सोपान इंगळे यांनी वेस्ट सेग्रिगेशन व ‘सॉर्ट’ची माहिती दिली. नॅशनल पोल्युशन कंट्रोल असोसिएशनच्या प्रतिनिधींनी कचरा व्यवस्थापन पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य ढोले यांनी विद्यार्थ्यांना ‘पर्यावरण विज्ञान’ प्रकल्पांतर्गत ‘सॉर्ट’ जनजागृतीविषयक अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन डॉ. भाग्यश्री अत्रे यांनी केले. ग्रीन क्लब इंचार्ज डॉ. विजया विचारे यांनी संयोजन केले.
(74392)
संविधान दिन उत्साहात
- तेजस्विनी चौधरी (एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट)
एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे संविधान दिन औचित्यपूर्ण वातावरणात साजरा झाला. राष्ट्राच्या पायाभूत मूल्यांचा न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, पुनःस्मरण करून विद्यार्थ्यांना संविधानाच्या आत्म्याशी जोडणारा प्रेरणादायी संदेश दिला. प्रथम वर्ष एमबीएच्या श्रावणी कानोरे यांनी संविधानाचे महत्त्व सांगितले. द्वितीय वर्ष एमबीएच्या प्रशांत सयाईस यांनी प्रस्तावना-वाचन केले. महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर, डॉ. काजल माहेश्वरी (विद्यार्थी विकास अधिकारी) उपस्थित होते. संविधान दिनानिमित्त सर्वांनी भारतीय संविधानाचा सन्मान राखण्याची व त्यातील मूल्ये आचरणात आणून जबाबदार नागरिकत्व जपण्याची प्रतिज्ञा केली.
(74393)
सर्वोत्तम राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
- श्रेया लोहार/वैष्णवी मुंजाळ (अजिंक्य डी. वाय. पाटील अभियांत्रिकी संस्था)
चऱ्होली येथील अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाने इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या (आयएसटीई) ५५व्या राष्ट्रीय वार्षिक प्राध्यापक परिषदेमध्ये ‘सर्वोत्तम खासगी अभियांत्रिकी शिक्षण संस्था -२०२५’ हा अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार प्राप्त केला. पाँडिचेरी येथील एस. एम. व्ही. अभियांत्रिकी संस्थेमध्ये कार्यक्रम झाला. प्राचार्य डॉ. फारुक सय्यद यांनी पुरस्कार स्वीकारला. ते म्हणाले, ‘‘महाविद्यालयाच्या प्रवासातील हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे, यात शंका नाही. हे यश सांघिक कार्यामुळेच शक्य झाले आहे. मी हा पुरस्कार माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमास समर्पित करतो.’’ अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. जैन यांनी मार्गदर्शन केले. संस्था समूहाचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील, कार्यकारी उपाध्यक्षा डॉ. कमलजीत कौर यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
(74390)
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

