शहरातील क्राइम

शहरातील क्राइम

Published on

गांजा बाळगणाऱ्या तिघांवर कारवाई
पिंपरी : भूमकर चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर गौरव देवराव चक्रनाराण (वय २७, रा. ताथवडे) याच्याजवळ ३१२ ग्रॅम गांजा, मोबाइल आणि रोकड असा ३० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत वाकड पोलिसांनी आरोपीस नोटीस बजावली आहे. तर, दुसऱ्या कारवाईत अनिल जग्गनाथ बोरसे (वय ४१, रा. देहूरोड) हा देहूरोड पोलिस स्टेशन परिसरात १९१ ग्रॅम गांजा बाळगताना आढळला. त्याला देहूरोड पोलिसांनी अटक केली. तिसऱ्या कारवाईत वाकड म्हातोबानगर झोपडपट्टीत सोमनाथ अनिल गुंजाळ (वय १८, रा. वाकड) याच्याजवळ ६३१ ग्रॅम गांजा आढळल्याने पोलिसांनी त्यालाही अटक केली.

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी : काळेवाडी–जगताप डेअरी परिसरातून ताथवडे सेवा रस्त्याकडे जाताना दुचाकीस्वार कुशेश्र्वर प्रसाद (वय ५३) यांना मालवाहू टेम्पोने (एमएच १४ डीएम ३९३६)
धडक दिली. यात कुशेश्र्वर प्रसाद यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा सोनी कुशेश्र्वर प्रसाद (वय २९, रा. पुनावळे) यांनी हिंजवडी पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपी रिंकुकुमार मल्होत्रा (वय ३५, रा. ताथवडे) याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

कंपनीसमोर मद्यप्राशनास विरोध केल्याने मारहाण
पिंपरी : दिघी येथील एका कंपनीसमोर मद्यप्राशन करण्यास विरोध केल्याच्या रागातून कामगाराच्या मित्रांनी कंपनी मालकाला मारहाण केली. फिर्यादी प्रणव इंद्रसिंग सोळंके (वय २२, रा. लोहगाव) यांनी अभिषेक घोरपडे यास विरोध केला होता. याच कारणावरून अक्षय दौंडकर (रा. दिघी) आणि शाहरुख पठाण (रा. दिघी) यांनी सोळंके यांना मारहाण केल्याची फिर्याद दिघी पोलिसांत दे्यात आली आहे.

अमली पदार्थ बाळगणाऱ्याला चिखलीत अटक
पिंपरी : एमडी हा अमली पदार्थ बाळगणाऱ्याला चिखली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई चिखली येथील मोरेवस्ती परिसरात करण्यात आली. यश उर्फ रघु अतुल कदम (वय २५, रा. ओटास्किम, निगडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे १० ग्रॅम एमडी पदार्थ सापडला.

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी युवकाला अटक
पिंपरी : परवाना नसतानाही पिस्तूल बाळगणाऱ्याला देहूरोड पोलिसांनी अटक केली. आशिष दत्तात्रय भालेराव (वय २७, रा. साईनगर, देहूरोड) असे आरोपीचे नाव आहे. या पिस्तूलाची किंमत सुमारे ५१ हजार आहे. त्यासोबत एक काडतूसही जप्त करण्यात आले आहे. आशिष याने हे पिस्तूल कोठून मिळविले, याचा शोध पोलिस घेत आहेत.

...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com