लेखापरिक्षणावर अनेक सोसायट्यांची फुली
किंवा
लेखापरिक्षणाबाबत गृहनिर्माण संस्था उदासीन
शहरातील सुमारे साडे तीन हजार सोसायट्यांकडून पुर्तता नाही
पिंपरी, ता. ९ : शासन नियमानुसार लेखापरिक्षण अहवाल दरवर्षी वेळेत सादर करणे बंधनकारक असताना आहे. याबाबत पिंपरी चिंचवडमधील गृहनिर्माण संस्थां मात्र उदासीनता दिसत आहेत. शहरातील दोन्ही उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयांतर्गत सुमारे साडे तीन हजार संस्थांचा अहवाल प्रलंबित आहे.
लेखापरिक्षण अहवाल त्वरित सादर न केल्यास या सोसायट्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. शहरात उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर तीन आणि पुणे शहर सहा यांच्या अंतर्गत गृहनिर्माण सोसायट्यांची नोंदणी होते. उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर तीन अंतर्गत सुमारे पंधराशे सोसायट्यांनी लेखापरिक्षण पूर्ण केलेले नाही. उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर सहा अंतर्गत जेमतेम नऊशेहून जास्त सोसायट्यांनी पूर्तता केली आहे.
लेखापरिक्षण सादर न केलेल्या सोसायट्यांनी उपनिबंधकांनी नोटिसा बजावल्या आहेत. त्वरित अहवाल द्यावा, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. ज्या सोसायट्या अहवाल सादर करणार नाहीत, त्यांची पोलिसांमध्ये तक्रार करून आर्थिक नियोजनाचे दफ्तर ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली जाते. त्यानुसार स्वतंत्र प्राधिकृत अधिकारी नियुक्त करून हा अहवाल पूर्ण करून घेण्याची प्रक्रिया उपनिबंधक सहकारी संस्थांकडून केली जाणार आहे.
दृष्टिक्षेपात
कार्यालय / एकूण गृहनिर्माण संस्था / लेखापरिक्षण पूर्ण / लेखापरिक्षण अपूर्ण
उपनिबंधक सहकारी संस्था (३) / ३९६७ / २५०० / १४४७
उपनिबंधक सहकारी संस्था (६) / ३२२४ / ९१६ / २३०८
असे आहेत निकष
- दरवर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत लेखापरिक्षण अहवाल मिळावा
- ३० सप्टेंबर पर्यंत सर्वसाधारण सभा घ्यावी
- सर्वसाधारण सभेत विषयपत्रिकेवरील अहवालाचे वाचन
- अहवालातील त्रुटींची दुरुस्ती करावी
- पुढील वर्षाच्या लेखापरिक्षकाची नियुक्ती करावी
---
विलंबाची कारणे
- लेखापरिक्षण सादर करण्याबाबत जनजागृतीचा अभाव
- मोठ्या सोसायट्या व्यवस्थापक नेमतात, पण लहान सोसायट्यांचा कारभार सभासदांकडूनच
- मानधन, पगार नसल्याने वेळ मिळेल तसे सोसायटीचे काम केले जाते
- अनेक सभासदांचे नोकरीनिमित्त इतर ठिकाणी स्थलांतर
- वैयक्तिक हेवेदावे
---
सोसायट्यांचे लेखापरिखण दरवर्षी नियमित होणे गरजेचे आहे. सभासदांच्या पैशांचा योग्य वापर होतो किंवा नाही हे त्यामधून स्पष्ट होते. या अहवालामुळे पारदर्शकता येते.
- राहुल घुले, रहिवासी, नेक्सस अल्टेनियम बोऱ्हाडेवाडी
---
सुमारे ७० टक्के सोसायट्या लेखापरिक्षण अहवाल सादर करीत नाहीत. आम्ही फेडरेशनच्यावतीने वारंवार जनजागृती करतो. मात्र सोसायट्यांमध्ये उदासीनता दिसते. आता शासनानेच पुढाकार घेऊन मार्ग काढला पाहिजे.
- संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाउसिंग फेडरेशन
---
शासनाने दिलेल्या मुदतीत लेखापरिक्षण अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. लेखापरिक्षण करण्याची जबाबदारी गृहनिर्माण सोसायटीकडे निर्धारित केली आहे. त्यांनी अहवाल सादर केला नाही तर आम्ही प्राधिकृत अधिकारी नियुक्त करून लेखापरिक्षणाचे काम पूर्ण करतो.
- मुकुंद पवार, उपनिबंधक, सहकारी संस्था (६) पुणे
-----
74952 सोसायटी
74954 ऑडिट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

