सकाळ संवाद

सकाळ संवाद
Published on

सकाळ संवाद

रेल्वे गेट ओलांडून धोकादायक प्रवास
कासारवाडी येथील रेल्वे गेट ओलांडून धोकादायक पद्धतीने नागरिक ये-जा करतात. याकरिता महापालिकेने लोखंडी पूल उभारला. परंतु, नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले व ते रेल्वे गेट ओलांडूनच जाणे पसंत करू लागले. अनेकदा नागरिकांचे महापालिकेने, सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रबोधन केले. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. नागरिकांच्या पूल वापराकडे दुर्लक्षामुळे या पुलाची दुरवस्था झाली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा, गवत, झाडे उगवली आहेत, भिकारी, गर्दुल्ले, मद्यपी यांचा अड्डा तयार झाला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक पुरते वैतागले आहेत. सदर पूल काढून टाकण्यात यावा म्हणजे त्याचा गैरवापर होणार नाही, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
-प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
PNE25V76618

चिंचवड गावातील बॅरिकेड्‍स हटवावेत
चिंचवड गावातील श्री संत मोरया गोसावी यांचा उत्सव साजरा होऊन जवळपास ५ ते ६ दिवस झाले तरी वाहतूक शाखेच्या वतीने वाहतुकीला अडथळे ठरणारे बॅरिकेड्‍स अजूनही हटविण्यात आले नाहीत. लवकरात लवकर बॅरिकेड्‍स हटवावेत व वाहतूक सुरळीत करावी.
-सिराज बशीर शेख
NE25V76619

वाकडमधील खड्डे बुजवावेत
वाकड येथील दत्त मंदिर रस्त्यावर बहिरम हॉटेल व राजवाडी हॉटेलसमोर वाहतुकीची वर्दळ असलेल्या रस्त्यावर अनेक महिन्यांपासून महापालिकेने खड्डा खोदून ठेवला आहे. कामाची पुर्तता झालेली दिसत आहे. तरी खड्डा बुजविण्यात आलेला नाही. खड्ड्याभोवती सुरक्षेबाबत कोणतीच उपाययोजना केलेली नाही. खड्ड्याभोवती राडारोडा, कचरा साचला आहे. हा खड्डा रात्रीच्या वेळी दिसून येत नाही. त्यामुळे किरकोळ अपघात होत आहेत. रस्त्यावरील सर्वच खड्डे बुजविण्याबाबत व अडथळे दूर करण्याबाबत महापालिकेत अनेक वेळेस विनंती करूनही महापालिकेने उपाययोजना केलेल्या नाहीत. अत्यंत गंभीर बाब आहे. काही दिवसापूर्वी निगडी येथे खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. याची दखल घेऊन कोणताही मोठा अपघात होण्यापूर्वीच वाकड परिसरातील व शहरातील सर्व खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत. तसेच रस्त्यावरील राडारोडा, पाइप, टाकाऊ साहित्य, भंगार साहित्य, लोखंडी गर्डर व रस्त्यावर ठेवण्यात आलेले दुभाजक त्वरित हटवून वाहतुकीस होणारे अडथळे दूर करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करावी.
-दिलीप बाफना, वाकड
PNE25V76617

झाडांचे रंगकाम निकृष्ट दर्जाचे
प्राधिकरणामध्ये ‘अ’ प्रभागात रस्त्यावरील झाडांना पांढरा व गेरूचा रंग लावला आहे. अत्यंत निकृष्ट असे काम झाले आहे. ठेकेदार पैसे घेतात पण त्यांच्या गुणवत्तेकडे कोण लक्ष देणार जनतेचा पैसा असा वाया घालू नका. रहिवाशांचे म्हणणे आम्हाला सांगा आम्ही स्वतः रंगून देतो त्वरित यावर कारवाई करावी. कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे वसूल करून काम करून घ्यावे.
-दत्ता धामणस्कर, प्राधिकरण
PNE25V76616

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com