बॉम्ब सदृश्यवस्तू पाठवून 
डॉलरमध्ये खंडणीची मागणी

बॉम्ब सदृश्यवस्तू पाठवून डॉलरमध्ये खंडणीची मागणी

Published on

पिंपरी : अज्ञात व्यक्तीने एक व्यक्तीला आणि त्यांच्या मुलांना वेळोवेळी ई-मेल मेल पाठवून आणि बॉम्बसदृश्य संशयास्पद वस्तू कुरिअरने पाठवून डॉलरमध्ये खंडणीची मागणी केली. हा प्रकार रावेत येथे घडला. या प्रकरणी रावेत येथील ५४ वर्षीय व्यक्तीने रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला अज्ञात व्यक्तीने फिर्यादी व त्यांच्या मुलांना मेल करून १० हजार डॉलरची मागणी केली. पैसे न दिल्यास चोवीस तासानंतर ३० हजार डॉलर द्यावे लागतील, अशी धमकी दिली. त्यानंतर दुसऱ्या मेलमध्ये ३० हजार डॉलरची मागणी केली. आठ डिसेंबर रोजी फिर्यादी यांच्या घरी उबर ॲटो मार्फत पत्र आणि पार्सल पाठवले, पार्सलमध्ये बॉम्ब सदृश संशयास्पद वस्तू होती आणि पत्रात २० हजार डॉलरची मागणी केली. सुरुवातीला हा खोडसाळपणा केला असावा, असे फिर्यादीच्या समज झाला. परंतु, १४ डिसेंबर रोजी पहाटे पुन्हा धमकीचा मेल आला, ज्यात १२ हजार डॉलरची मागणी केली आणि ही मागणी पूर्ण न केल्यास चोवीस तासानंतर २० हजार डॉलर द्यावे लागतील, अशी धमकी दिली.

जुगार प्रकरणी १० जणांवर गुन्हा
पिंपरी : देहूतील विठ्ठलवाडी येथील इंद्रायणी नदीकाठी मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या दहा जणांवर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला. विजय भालेकर, पंढरीनाथ मोरे, राजू बोत्रे, सोपान शेलार, बाबासाहेब रासकर, चंद्रशेखर परंडवाल, बबन कोळेकर, दत्तात्रेय हगवणे, सुभाष काळोखे आणि भरत रौंधळ अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून त्यांच्याकडून २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com