संदीप काटे
लेख वाचन
--------
जनतेशी जोडलेले नेतृत्व
अनिता संदीप काटे
संदीप विठ्ठल काटे
पिंपळे सौदागर म्हटले, की अनेक उपक्रम, सामाजिक बांधिलकी, संस्कृतीचे संवर्धन आणि नागरिकांशी जोडून राहणारे नेतृत्व यात अग्रभागी नाव येते अनिता संदीप काटे आणि संदीप विठ्ठल काटे यांचे. त्यांनी केवळ कार्यक्रम आयोजित केले, सभा घेतल्या किंवा घोषणाबाजी केली असे नाही, तर त्यांच्या कामाचा उद्देश नेहमीच समाजाला एकत्र आणणे, समस्या सोडवणे आणि पुढील पिढ्यांसाठी सक्षम, सुरक्षित आणि सुसंस्कृत परिसर उभा करणे हा राहिला आहे.
संदीप काटे यांनी आपला सामाजिक आणि राजकीय प्रवास २००७ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवत सुरू केला. २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध लढत असताना विजय थोडक्यात निसटला. पण, त्यांनी त्याला पराभव नव्हे; तर शिकवण म्हणून स्वीकारले. जनहिताची कामे सुरूच ठेवत सातत्याने जनसंपर्क वाढविला आहे.
मागील काही वर्षांपासून ते भारतीय जनता पक्षासोबत कार्यरत असून पोटनिवडणूक असो किंवा विधानसभा निवडणूक. तत्कालीन आमदार अश्विनी जगताप आणि विद्यमान आमदार शंकर जगताप यांच्या विजयात त्यांचे कार्य महत्वाचे ठरले. त्यांनी नेहमीच नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर आवाज उठविला.
स्थानिक रस्ते विकसित करणे, पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा, वाहतूक नियोजन, स्वच्छता आणि सुरक्षा यावर सातत्याने पाठपुरावा, संरक्षण विभागाच्या जमिनीवरील रस्ता तयार करण्यासाठी प्रयत्न, पोलिस ठाणे आणि नागरिकांमध्ये समन्वय साधण्याचे काम ते करत आले आहेत. विशेष म्हणजे संबंधित काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणे हे काटे यांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य ठरले आहे.
समाजाशी जोडलेले उपक्रम
संदीप काटे आणि अनिता काटे त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम सुरू ठेवले आहेत.
यात प्रामुख्याने रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, गणेशोत्सव, शिवजयंती, नवरात्र कार्यक्रम, हर घर तिरंगा मोहीम, वृक्षारोपण उपक्रम प्लॅस्टिकमुक्त परिसरासाठी जनजागृती, कपडी पिशवी मोहीम, हॅपी स्ट्रीट, दहीहंडी, बालमेळावे ‘वॉल ऑफ ह्युमॅनिटी’ यासारखे देणगी आणि मदतीची भावना वाढवणारा उपक्रम त्यांनी घेतले. हे उपक्रम केवळ कार्यक्रम नव्हते, तर त्याद्वारे त्यांनी परिसरात एकता, संस्कृती आणि नागरिकत्व भावना वाढवली.
शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका
गेल्या १५ वर्षांपासून चालणाऱ्या चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणात नवकल्पना आणली. कोरोना संसर्ग काळात अनेक कुटुंबांना शैक्षणिक शुल्कात सवलत, तांत्रिक मदत आणि मानवी समर्थन देऊन त्यांनी शिक्षण अबाधित ठेवले.
संवेदनशील नेतृत्व
चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या अध्यक्षा म्हणून अनिता काटे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर काम करतात. त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त पुस्तके नव्हेत; तर कौशल्य, आत्मविश्वास आणि संस्कार यांचा समावेश असलेली शिकवण होय. यासोबतच रोबोटिक्स डे, आविष्कार प्रकल्प, क्रीडा, कला आणि विज्ञानाची जोड, व्यावहारिक शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास यावर त्या भर देत असतात.
महिला सक्षमीकरण
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह त्यांना आत्मविश्वास मिळवून देणे आणि स्वावलंबी बनवणे हे त्यांचे ध्येय आहे. यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. यात प्रामुख्याने आरोग्य तपासणी, लघुउद्योग प्रशिक्षण, स्वयंसाहाय्य गट मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास आणि नेतृत्व कार्यशाळा यासारखे महिला सक्षमीकरणाचे उपक्रम त्यांनी राबविले. त्यामुळे आज अनेक महिला व्यवसाय, रोजगार आणि सामाजिक भूमिकांमध्ये पुढे येत आहेत.
युवकांसाठी प्रेरणा
संदीप काटे आणि नीलेश काटे युवा मंच यांच्या सहकार्याने युवकांना क्रीडा, प्रोत्साहन आणि नेतृत्वासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. सौदागर प्रीमियर लीग, कबड्डी स्पर्धा, युवक नेतृत्व कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. यामुळे युवक खेळाडू, आयोजक आणि उत्तरदायी नागरिक म्हणून विकसित झाले.
पर्यावरण, स्वच्छतेसाठी प्रयत्न
वृक्षारोपण, प्लॅस्टिकमुक्त पिंपळे सौदागर मोहीम, स्वच्छता आणि जनजागृती, प्रदूषणविरहित परिसरासाठी उपक्रम काटे यांनी राबविले आहेत. स्वच्छ परिसर म्हणजे फक्त महापालिकेची जबाबदारी नव्हे, तर नागरिकांचीही असल्याचा स्पष्ट संदेश ते देत असतात.
लोकांशी जोडलेले नेतृत्व
संदीप आणि अनिता काटे यांचे नेतृत्व कागदावर नाही, तर लोकांच्या अनुभवात आहे. लोक म्हणतात, ‘‘ते फक्त नेतृत्त्व करत नाहीत, तर ते ऐकतात. समजून घेतात आणि काम करून देतात.’’ सशक्त, सुरक्षित आणि सुसंस्कृत पिंपळे सौदागर हे काटे यांचे ध्येय आहे. सुविधांयुक्त आधुनिक परिसर, सांस्कृतिक वारसा, शिक्षित, प्रगत आणि एकसंघ समाज आणि आगामी पिढ्यांसाठी उत्तम वातावरण देण्याचा त्यांचा मानस आहे. सेवा ही प्रसिद्धीसाठी नाही. ती समाजासाठी असते आणि ती सातत्याने केली पाहिजे, अशी त्यांची धारणा आहे. पिंपळे सौदागरच्या सामाजिक आणि राजकीय नेतृत्वात अनिता संदीप काटे व संदीप विठ्ठल काटे हे दाम्पत्य युगद्रष्टे म्हणून समोर आले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सेवा, विकास आणि संघटनक्षमता यांचे प्रभावी संयोजन झाल्याने परिसराच्या समस्यांचे निराकरण सहजपणे होत आहे. हे नेतृत्व जागतिक दृष्टिकोनातून नाही; तर लोकांच्या अंमलात येणाऱ्या कामावर जोर देणारे आहे.
अनिता संदीप काटे यांचे आरोग्य व महिला सक्षमीकरणातील कार्य
अनिता काटे यांनी आरोग्य क्षेत्रात विविध मोफत आरोग्य शिबिरे, कॅन्सर, थायरॉईड, ब्लड टेस्टिंग आणि मॅमोग्राफी यांसारख्या तपासण्या यशस्वीपणे राबविल्या आहेत. या उपक्रमांनी महिलांमध्ये आरोग्य जागरूकता वाढविली असून स्वयंसहाय्य गटांना प्रशिक्षण आणि रोजगार मार्गदर्शन देऊन महिलांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने मार्गदर्शन केले आहे. अशा प्रत्यक्ष अंमलबजावणीवर आधारलेले उपक्रम त्यांच्या कामाचा महत्त्वाचा भाग आहेत.
संदीप विठ्ठल काटे यांचे युवक व सामाजिक संघटन
संदीप काटे यांनी युवकांसाठी सौदागर प्रीमियर लीग, क्रीडा स्पर्धा आणि नेतृत्व कार्यशाळा यांसह अनेक उपक्रम राबवून युवकांमध्ये क्रीडा संस्कृती व एकात्मता निर्माण केली आहे. क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन या क्रीडा क्षेत्रात त्यांनी ऊर्जा व सहभाग वाढविला आहे. या व्यतिरिक्त, सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि रक्तदान शिबिरे यांसारख्या सामाजिक बांधिलकीत त्यांनी महत्वाचा सहभाग घेतला आहे.
विकास आणि नागरिकांच्या सोयीसाठी घेतलेले उपक्रम
पिंपळे सौदागरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक नियोजन, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक उद्याने व खेळाचे मैदान विकास, महिला सुरक्षितता आणि नागरिकांच्या आरोग्य सुविधा यांसारखी अनेक समस्या काटे दाम्पत्य सातत्याने समोर आणत आहेत. स्थानिक महापालिका, पोलीस आणि विभागांशी समन्वय साधून अनेक उपक्रमांवर कारवाई केली जात आहे. या सगळ्यांमध्ये त्यांचा आवाज कमी आणि काम महत्त्वाचे भासते.
राजकीय साक्षरता आणि कार्यपद्धती
भाजपच्या कट्टर समर्थक असलेल्या काटे दाम्पत्याने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप व सध्याचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनात्मक कामावर भक्कम पकड निर्माण केली आहे. त्यांची कार्यपद्धती प्रामाणिक संवादावर आधारित असून निव्वळ राजकारणाच्या वादविवादांपेक्षा लोकांसाठी काम करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे पिंपळे सौदागरमधील त्यांचा प्रभाव अधिक दृढ होतो आहे.
शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचा विकास
चॅलेंजर पब्लिक स्कूलमार्फत मुलांना तंत्रज्ञान, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पर्यावरण शिक्षण व क्रीडा स्पर्धांचा लाभ देऊन बालविकासाला नवे आयाम उपलब्ध करून दिले आहेत. पालकांच्या कौतुकास पात्र असलेले हे व्यासपीठ समाजात महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांमध्ये सकारात्मक बदल घडवत आहे.
ज्येष्ठ नागरिकांशी संवाद
पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डन, पी.के. चौक येथे आज संदीप विठ्ठल काटे यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत मनमोकळा संवाद साधला. परिसरातील स्वच्छता, सुरक्षा, सार्वजनिक सुविधा, आरोग्यविषयक गरजा तसेच दैनंदिन येणाऱ्या अडचणी यावर ज्येष्ठांनी मांडलेल्या सूचनांची दखल घेण्यात आली. समाजातील ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव आणि मार्गदर्शन हे नेहमीच कार्याला दिशा देणारे असतात. त्यांच्या अपेक्षांचा आदर ठेवून येणाऱ्या काळात आवश्यक ते उपक्रम राबवण्याची सकारात्मक हमी यावेळी देण्यात आली. अशा संवादामुळे परिसरातील समस्या केवळ समजून घेण्यास मदत होत नाही, तर त्यांवर परिणामकारक उपाययोजना करण्याची ऊर्जा देखील मिळते, असे संदीप काटे यांनी सांगितले.
भाजपा कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती
भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य कार्यकर्ता मेळावा नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शहराध्यक्ष मा. श्री. शत्रुघ्नबाप्पू काटे यांच्या पुढाकारातून चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या मेळाव्यास भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण तसेच प्रदेश सरचिटणीस मा. श्री. राजेशजी पांडे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
पिंपळे सौदागर येथील राष्ट्र सेविका समिती-वीरश्री शाखेतर्फे आयोजित विजयादशमी उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सौ. अनिताताई संदीप काटे यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला. संस्कृती, सेवा, शौर्य, शिस्त आणि उत्साह याचे प्रतीक असलेले हे संचलन देशभक्तीने भारलेल्या वातावरणात संपन्न झाले.
कर्करोग जनजागृती अभियान
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील व समर्थ युवा प्रतिष्ठान अध्यक्ष राजेशजी पांडे यांच्या सहकार्यातून व भाजप शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न बाप्पू काटे यांनी आयोजित केलेल्या कर्करोग जनजागृती अभियान येथे सौ. अनिताताई संदीप काटे उपस्थित होत्या. महिलांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता वाढविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मोफत कॅन्सर जनजागृती आणि आरोग्य तपासणी शिबिराला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसाद मिळाला.
आरोग्यविषयक तपासणी आणि मार्गदर्शन
शिबिरात महिलांसाठी स्तनाचा कॅन्सर तपासणी, मॅमोग्राफी, रक्त तपासणी CBC, ब्लड शुगर, बीपी चाचणी, डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन अशा सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच गरजेनुसार आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती वाढली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

