पिंपरी-चिंचवड
ख्रिसमसनिमित्त बाजारपेठेत उत्साह (फोटो फिचर)
ख्रिसमसनिमित्त बाजारपेठेत उत्साह
प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना म्हणजेच ख्रिसमस हा सण आज सर्वत्र आनंदाने व उत्साहात साजरा होणार आहे. त्यामुळे शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या पिंपरी कॅम्पात दुकाने विविध वस्तूंनी सजली आहेत. ख्रिस्ती बांधवांच्या घरांवर चांदणीच्या आकारातील आकाशकंदील तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते त्यामुळे आकाशकंदील, ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, घर सजविण्यासाठी विविध सजावटीचे साहित्य, लाल रंगाच्या टोप्या खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्याचीच ही चित्रमय झलक. (संतोष हांडे : सकाळ छायाचित्रसेवा)

