दरमहा आठ हजार पेन्शन द्या, अन्यथा आंदोलन

दरमहा आठ हजार पेन्शन द्या, अन्यथा आंदोलन
Published on

पिंपरी, दि. २८ : सलग पाच वर्षे नूतनीकरण करणाऱ्या आणि वयाची ६० वर्षे पूर्ण करणाऱ्या बांधकाम कामगारांना सरसकट दरमहा आठ हजार रुपये पेन्शन (निवृत्तीवेतन) द्यावी, अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला आहे.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र संघटनेतर्फे पेन्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, संघटक विनोद गवई, भास्कर राठोड, महादेव गायकवाड, लाला राठोड, सुनीता दिलपाक, अंजना गायकवाड, अनिता मोरे, संगीता चव्हाण, विशाल मोरे, अलका आडे आदी उपस्थित होते.
कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी निवृत्तीवेतनाबाबत विधिमंडळात नुकतीच घोषणा केली. पण, हा प्रकार म्हणजे कामगारांच्या तोंडाला पाणे पुसण्यासारखा आहे. योजनेसाठी लावलेल्या अटी जाचक आहेत. या अटीनुसार मोजकेच कामगार योजनेसाठी पात्र होतील. दरमहा पाचशे रुपये ते सातशे पन्नास रुपये म्हणजे तुटपंजा लाभ आहे. यातून औषधेही खरेदी करता येणार नाहीत. योजनांच्या लाभासाठी कामगारांना १०, १५, २० वर्षे नोंदणीची अट घालू नये, असे नखाते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com